शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘आत्मा’तर्फे ५ हजार किलो मका बियाणांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:58 IST

जिल्ह्यात दुष्काळ असल्यामुळे कृषीतंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २६९ लाभार्थ्यांना मका बियाणाचे वाटप करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : यंदा जिल्ह्यात दुष्काळ असल्यामुळे कृषीतंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २६९ लाभार्थ्यांना मका बियाणाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच उगवलेल्या मक्याची कृषी विभागाचे पदाधिकारी वेळोवेळी पाहणी करून संबंधित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.दुष्काळामुळे यंदा प्रथमच आत्माअंतर्गत पीक प्रात्यक्षिकातून चारा पिकाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. या अंतर्गत जिल्ह्यात २६९ लाभार्थ्यांना एकरी २० किलो मका बियाणे या प्रमाणे ५ हजार ४० किलो बियाणांचे वाटप करण्यात आले असून २५२ एकरवर चारा पीक प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे.कृषीतंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा या योजनेअंतर्गत जिल्हाभरात श्री. संत सावता महाराज लोंढेवाडी, स्वामी समर्थ शेतकरी स्वयं सहायता गट नांदापूर, बळीराजा शेतकरी गट माळीपिंपळगाव इ. २ हजार १२२ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली आहे.या गटांना वेळोवेळी शेततळी मत्स्यपालन, शेळीपालन व कौशल्य आधारित विकास प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच पीक प्रात्यक्षिके घेतली जात आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी कार्यालय सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक दत्तात्रय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजना