शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात वीज वितरण कंपनीचा दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:37 IST

वीजवितरण कंपनीकडून नादूरूस्त ट्रान्सफार्मर देताना दुजाभाव केला जात असल्याचा आरोप जिल्ह्यातील शेतक-यांनी केला आहे. या संदर्भात जिल्हाधिका-यांना निवेदन दिले असून, यात वानडगाव, देळेगव्हाण, कडेगाव या गावातील संतप्त शेतक-यांनी हे निवेदन देतानाच आत्म दहनाचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देजालना : मर्जितील शेतकऱ्यांना प्राधान्याचा मुद्दा कळीचा

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वीजवितरण कंपनीकडून नादूरूस्त ट्रान्सफार्मर देताना दुजाभाव केला जात असल्याचा आरोप जिल्ह्यातील शेतक-यांनी केला आहे. या संदर्भात जिल्हाधिका-यांना निवेदन दिले असून, यात वानडगाव, देळेगव्हाण, कडेगाव या गावातील संतप्त शेतक-यांनी हे निवेदन देतानाच आत्म दहनाचा इशारा दिला आहे.जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण तसेच जालना तालुक्यातील वानडगाव आणि बदनापूर तालुक्यातून कडेगाव येथील हे संतप्त शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी धडकले होते. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते डॉ. आप्पासाहेब कदम हे देखील त्यांच्या सोबत होते. त्या शेतकºयांनी सांगितले की, आमच्या गावातील ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर ते दुरूस्तीसाठी वीजवितरण कंपनीकडे पाठविले होते. त्यावेळी महिन्याभरापूर्वी आमची तेथे नोंद असतानाही तेथील अधिकारी आणि कर्मचाºयांनी मिलीभगत करून अर्थपूर्ण व्यवहार करून जे ट्रान्सफार्मर आमच्या नंतर दुरूस्तीसाठी आले होते, त्यांना आमच्या अधी वितरीत केले.आम्ही वीज वितरण कंपनीच्या या धोरणाचा निषेध करत असून, रोस्टरप्रमाणे त्यांनी ते वितरीत का केले नाहीत, असा सवाल केला असता, आॅईल नसल्याचे कारण सांगून आम्हांला तेथून काढून दिले. या सर्व गंभीर प्रकरणाची चौकशी करावी, नसता आम्ही आत्मदहन करू असा इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी राजू निंबाळकर, अनिल निंबाळकर, बाबूराव कापसे, भगवान कापसे, किशोर नागवे, अभिमन्यू नागवे तसेच पंडित शिंदे दामोधर नागवे यांच्यासह अन्य २० ते २५ शेतकºयांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. कदम यांनी शेतकºयांना शांत केले.पाण्या अभावी द्राक्षबाग सुकलीगेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे अन्य पिकांप्रमाणेच द्राक्ष बागेलाही मोेठा फटका बसला आहे. शेतातील विहीरीत मुबलक पाणी आहे, परंतु गावात वीजपुरवठा नसल्याने ते देता येत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया वानडगाव येथील शेतकºयांनी सांगितली. त्यातच वीजवितरण कंपनीतील भोंगळ आणि अधिकाºयांचे तोंडपाहून मदत करण्या मागील हेतूमुळे आम्ही हतबल झालो असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Jalanaजालनाmahavitaranमहावितरण