शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अपक्षांमुळे बिघडते मतांचे गणित..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:36 IST

अपक्ष उमेदवारांनी आपली आशा आणि अस्तित्व सोडले नसल्याचे गेल्या दोन निवडणुकांचा अभ्यास केल्यास दिसून येते.

दीपक ढोले।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकशाही स्वीकारलेल्या भारतामध्ये निवडणूक लढविण्याचे अधिकार ज्याप्रमाणे राजकीय पक्षांच्या उमेदवारांना आहेत त्यात धर्तीवर अपक्ष उमेदवारांनाही निवडणूक लढण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळेच तुम्ही कुठल्याही पक्षाचे सक्रिय सदस्य नसलात तरी तुम्हाला निवडणुकीत उभे राहता येते.जालना लोकसभा मतदार संघाचा विचार केल्यास पूर्वीपासूनच मतदारांनी राजकीय पक्षाच्या उमेदवारांनाच आपल्या मतदानाने विजयी केले आहे. हे जरी खरे असले तरी अपक्ष उमेदवारांनी आपली आशा आणि अस्तित्व सोडले नसल्याचे गेल्या दोन निवडणुकांचा अभ्यास केल्यास दिसून येते. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण २२ उमेदवार रिंंगणात होते. पैकी अपक्षांची संख्या ११ होती. त्यावेळी प्रमुख राजकीय पक्ष अर्थात काँग्रेस आणि भाजपा यांच्यात काट्याची टक्कर झाली. त्यावेळी काँग्रेसचे कल्याण काळे यांनी भाजपचे परंपरागत उमेदवार खासदार रावसाहेब दानवे यांना नाकी नऊ आणले. दानवे हे त्यावेळी केवळ ८ हजार ३०० मतांनी विजयी झाले होते. यावेळी ११ अपक्षांना पडलेल्या मतांचा विचार केल्यास अपक्षांनी आणखी जोर लावला असता तर जालना लोकसभा निवडणुकीचे चित्र वेगळे दिसले असते. अपक्ष उमेदवारांमध्ये जिल्ह्यातील फारसे कोणी प्रतिष्ठित अथवा उच्च शिक्षित उमेदवार नसल्यानेही राजकीय पक्षांचे पितळ पांढरे होत गेले. एकूणच अपक्ष उमेदवार हे उमेदवारी दाखल करतात परंतु, त्यांना अवाढव्य असलेल्या लोकसभा मतदार संघात प्रचाराला फिरताना अनेक आव्हाने असतात. त्यात कार्यकर्त्यांचा अभाव, सक्षम आर्थिक क्षमता आणि कुठल्याही मुद्द्यावर मत मांडायचे झाल्यास मिळणारा प्रतिसाद हा अत्यल्प असतो. त्यामुळे अपक्ष उमेदवार मोठ्या हिमतीने रिंगणात उतरतात परंतु, जनमानसांकडून त्यांना मतांचे दान राजकीय पक्षांच्या तुलनेत खूप कमी दिले जाते. अपक्षांना कमी लेखून चालत नाही. परंतु, काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत आपल्या प्रतिस्पर्धेची मतविभागणी व्हावी म्हणून देखील अपक्षांना अप्रत्यक्षपणे उभे केले जाते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाPoliticsराजकारण