शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभाग सक्षम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:42 IST

सर्वसामान्य नागरिकांना अधिकाधिक चांगल्या आरोग्याच्या सेवा मिळाव्यात, यासाठी आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.

ठळक मुद्देराजेश टोपे : गुणवंत अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांचा गौरव, विविध सांस्कृतिक कार्यक्रम

जालना : सर्वसामान्य नागरिकांना अधिकाधिक चांगल्या आरोग्याच्या सेवा मिळाव्यात, यासाठी आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर रविवारी मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नाराण कुचे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आमदार अरविंद चव्हाण, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसय्यै, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शर्मिला भोसले, तहसीलदार संतोष बनकर, प्रशांत पडघन, भुजबळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.टोपे म्हणाले, मराठवाडा विभागासाठी आजपर्यंत मनोरुग्णांच्या उपचारासाठी मनोरुग्णालय नव्हते. जालना येथे या मनोरुग्णालयाच्या उभारणीसाठी शासनाने मंजुरी दिली असून, येत्या महिन्याभरात या मनोरुग्णालयाच्या कामास प्रारंभ होणार आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकºयांना व नियमित कर्जाची परतफेड करणाºयांना योजना लागू करण्याचा विचार सुरू आहे. पीकविमा, पीककर्जापासून शेतकरी वंचित राहू नयेत, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये ३५० पेक्षा अधिक गावांची निवड करण्यात आली आहे. ही योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची सूचनाही पालकमंत्री टोपे यांनी केली.यावेळी पालकमंत्र्यांनी परेडचे निरीक्षण केले. परेडमध्ये पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल गट, महिला पोलीस दल, होमगार्ड, बँडपथक, महिला सुरक्षा दामिनी पथक, दंगल नियंत्रण पथक, अग्निशामक दलासह विविध विभागाच्या चित्ररथांचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचलन निशिकांत मिरकले यांनी केले. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थीनींची उपस्थिती होती.मतदान आपल्या सर्वांचे कर्तव्यआपली लोकशाही अधिक मजबूत होत आहे. लोकशाही विकेंद्रीकरणाची कास धरणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करणाºया ७३ व ७४ व्या घटना दुरुस्त्या लक्षात घेता या वर्षामध्ये व त्यापुढे होणाºया सर्व निवडणुकांमध्ये सर्व मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून सहभाग घ्यावा. तसेच स्वत:बरोबर इतर सहकाºयांनाही मतदानाच्या कर्तव्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहनही टोपे यांनी यावेळी केले.

टॅग्स :JalanaजालनाRepublic Dayप्रजासत्ताक दिनRajesh Topeराजेश टोपे