शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दानवे पती-पत्नी कोट्यधीश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 01:00 IST

सलग पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंंगणात उतरलेले भाजपचे खा. रावसाहेब दानवे हे स्वत: आणि त्यांची पत्नी निर्मला दानवे हे दोघेंही कोट्यधीश असल्याचे रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या शपथपत्रातील माहितीनुसार पुढे आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सलग पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंंगणात उतरलेले भाजपचे खा. रावसाहेब दानवे हे स्वत: आणि त्यांची पत्नी निर्मला दानवे हे दोघेंही कोट्यधीश असल्याचे रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या शपथपत्रातील माहितीनुसार पुढे आले आहे.१९९९ पासुन रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदार संघातून भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत. चारही वेळेस ते विजयी झाले आहे. यावेळी पुन्हा त्यांनी त्यांचे भविष्य मतदारांच्या हाती सोपविले आहे.२०१४ मधील लोकसभेचा विचार करता त्यावेळी दानवेंची संपत्ती ही १५ कोटी ३७ लाख ४० हजार ६०० रूपये होती. तर त्यावेळी त्यांच्या पत्नी निर्मला दानवे यांच्या नावावर २ कोटी २७ लाख ९६ हजार एवढे बाजारमुल्य असलेली संपत्ती होती. रावसाहेब दानवेंच्या नावावर ९ हेक्टर ४२ आर जमीन असून, पत्नीच्या नावे ६ हेक्टर शेती आहे. निर्मला दानवे यांच्या नावावर चालू वर्षात २० लाख ७७ हजार ७४३ रूपयांची गुंतवणूक दाखविण्यात आलेली आहे. तर चालू वर्षात निर्मला दानवे यांची संपत्ती ३ कोटी ६४ लाख ८८ हजार रूपये दर्शविली आहे. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत रावसाहेब दानवे यांच्या संपत्तीत ६६ लाख रूपयांची वाढ झाली असून, पत्नीच्या संपत्तीत चक्क १ कोटी ३७ लाख रूपयांची वाढ झाल्याचे दिसून येते.विशेष म्हणजे रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या पत्नीला ८ लाख ५० हजार रूपयांचे कर्ज दिले असून, मुलगा आ. संतोष दानवे यालाही २५ लाख ५० हजार रूपयांचे कर्ज दिले असल्याचे नमूद केले आहे. दानवे यांच्याकडे आजघडीला अनेक नवनवीन चारचाकी गाड्याचे मॉडेल असले तरी शपथपत्रात मात्र त्यांनी एक अ‍ॅम्बेसेडर असल्याचे दर्शविले आहे.दानवेंकडे सोन्याच्या तुलनेत चांदी मोठ्या प्रमाणावर असून, ती जवळपास ४०० किलोचे दागदागिने असल्याचे नमूद केले आहे. दानवे यांचा मुख्य व्यवसाय हा शेती आणि समाजकार्य दर्शविला असून, लातूर आणि पैठण येथील दोन गुन्हे दानवें विरूद्ध नोंद आहेत. पैठण येथे नगर पालिकेच्या निवडणुकीच्यावेळी त्यांनी केलेले ‘लक्ष्मीदर्शनाचे’ वक्तव्य यावरून नगर पालिका अधिनियम १९६५ च्या (२२) १ कलमानुसार हा गुन्हा दाखल असल्याचे शपथपत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकraosaheb danveरावसाहेब दानवेjewelleryदागिने