देऊळगावराजा : गत आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे, गारपिटीमुळे रब्बीतील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती रियाज खा पठाण यांनी केली आहे.
गतवर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात रब्बीची पिके हाताशी आलेली असताना गारपीट, अवकाळी पाऊस झाला आहे. विभागाने आणखी पाऊस पडण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. अवकाळी पावसामुळे आंबा, मका, हरभरा, कांदा, ज्वारी, बाजरी, गहू या पिकांसह फळभाज्यांना तडाखा बसला असून, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती रियाज खा पठाण यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधाला, तसेच कृषी अधिकारी, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून नुकसानीचा अहवाल शासनाला द्यावा, अशा सूचना दिल्या, शिवाय नुकसानीचे अनुदान मिळावे, यासाठी पाठपुरावा करण्याबाबतही त्यांनी सूचित केले.