काँग्रेसची रविवारी बैठक
जालना : प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे हे रविवारी जालना येथे येत आहेत. काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार केला जाणार असून, बैठकही होणार असल्याची माहिती शेख महेमूद यांनी दिली आहे.
खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण
अंबड : अंबड, घनसावंगी तालुक्यातील दोन सीसीआय केंद्रांवर अडीच लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. यंदा या केंद्रांना कापूस खरेदीसाठी देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
नाव्हा परिसरात आग
जालना : तालुक्यातील नाव्हा परिसरातील दत्त आश्रमाजवळील जंगलाला मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. आगीत या भागातील गवत पूर्णपणे जळून खाक झाले. यावेळी अग्निशमन दलासह प्रशासनाने ही आग अटोक्यात आणली.
रस्त्यावर कचऱ्याचे ढीग
जालना : शहरातील भाग्यनगर परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. येथे कचराकुंडी नसल्याने नागरिक रस्त्यावर कचरा टाकत असून, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे.