शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मुद्रा योजनेची ‘मुद्रा’ उमटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:25 IST

मुद्रा योजनेंतर्गत बँकांकडून पाहिजे तसे काम होत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत पुढे आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात मुद्रा योजनेंतर्गत बँकांकडून पाहिजे तसे काम होत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत पुढे आले आहे. एकूण गेल्या चार वर्षांमध्ये या योजनेतून गोरगरीब व्यावसायिकांना जो वित्तीय पुरवठा व्हायला हवा होता, तो न झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे मुद्रा योजनेची माहिती असलेली पुस्तिका वितरित न करता त्याचे जवळपास तीन लाख रुपये खर्च झाल्याचे दर्शविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.जालना जिल्हा मुद्रा समितीची नुकतीच बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत २०१७-१८ मध्ये ३३ हजार ३७६ प्रकरणात २२६.५ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी सन २०१७ मध्ये २२८.७१ कोटी रुपये वाटप केले. यामध्ये शिशु गट ८५.३५ लाख, किशोर गट ९६.९७ लाख, तरुणा गट ४६.६९ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. सन २०१८ मध्ये शिशु गट ५५.५८ लाख, किशोर गट ४६.६० लाख, तरुण गट ३३.३३ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले.चालु वर्षी देखील कर्जवाटपाची गती मंदावलेली आहे. विशेष करुन जालना औरंगाबाद ग्रामीण बँक आणि पारध येथील बँकांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे सदस्यांनी सांगितले. शिशु योजनेतून ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते, तरुण गटासाठी ५० हजार ते ५ लाख आणि ५ ते १० लाख रुपयांचे कर्ज व्यवसायवृद्धीसाठी दिले जाते. बेरोजगारांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासह आहे त्या व्यवसायात आधाुनिकीकरण करण्यासाठी मुद्रा योजना महत्वाची भूमिका निभावते. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली १३ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. त्यात, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तसेच अशासकीय सदस्यांमध्ये रामेश्वर भांदरगे, देविदास देशमुख, बाबासाहेब कोलते, आयेशा खान मुलानी, सुभाष राठोड, अमोल जोशी यांचा समावेश आहे.पुस्तिका छपाईचा मुद्दा गाजलाजालना जिल्ह्यात मुद्रा योजनेची माहिती असलेली माहिती पुस्तिका अद्यापपर्यंत वितरित झालेली नाही. परंतु असे असताना पुस्तिका छपाईच्या नावाखाली ३ लाख ३१ हजार रुपयांचा निधी संबंधित एजन्सीला वितरित करण्यात आला आहे. यावर बैठकीस उपस्थित सदस्यांनी आक्षेप घेतला असता लवकच या पुस्तिकेचे वाटप केले जाईल, अशी सारवासारव माहिती आणि नियोजन विभागाने दिल्यावरून अशासकीय सदस्य बाबासाहेब कोलते यांनी आक्षेप घेतला.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाcollectorजिल्हाधिकारीBanking Sectorबँकिंग क्षेत्र