शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जालना महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 01:08 IST

जालन्यात तब्बल १६ वर्षानंतर जालना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सांस्कृतिक महोत्सवात अनेक दिग्गज कलावंताना निमंत्रित करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यात तब्बल १६ वर्षानंतर जालना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सांस्कृतिक महोत्सवात अनेक दिग्गज कलावंताना निमंत्रित करण्यात आले असून, जिल्ह्यातील कलाकारांनाही व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा लाभ जालनेकरांनी घ्यावा, असे आवाहनही लोणीकर यांनी गुरूवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.या महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता मंठा चौफुली जवळ उभरण्यात आलेल्या स्व. शारदादेवी पित्तीनगरात होणार आहे. महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम दररोज सायंकाळी सहा वाजता होणार आहेत. उद्घाटन शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे राहणार आहेत. यावेळी केंद्रीय सामजिक न्यायमंत्री रामदास आठवले, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. चंद्रकांत खैरे, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, आ. राजेश टोपे, आ. सुभाष झांबड, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, जि. प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उद्योजक राजेंद्र बारवाले, शांतीलात पित्ती, संजय राठी आदींची उपस्थिती राहणार आहे.या महोत्सवाचा समारोप २२ मे रोजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या यांच्या उपस्थितीत होणार असून, या वेळी विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील, धनंजय मुंडे, आयुक्त पुरूषोत्तम भापकर आदींची उपस्थिी राहणार असल्याची माहिती लोणीकर यांनी दिली. पत्रकार परिषदेत वीरेंद्र धोका, उद्योजक घनशाम गोयल, भावेश पटेल, सुदेश करवा, बंडू मिश्रीकोटकर उमेश पंचारिया यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.आज शोभायात्राजालना महोत्सवात जालेनकरांनी सहभागी व्हावे या हेतूने शुक्रवारी शहरातील मंमादेवी मंदिरापासून शोभायात्रेचे आयोजन सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे. यात अनेक कलाकार सहभागी होणार आहेत.

टॅग्स :cultureसांस्कृतिकBabanrao Looneykarबबनराव लोणीकर