शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

राजुरेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:30 IST

अंगारिका चतुर्थीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या राजुरेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : अंगारिका चतुर्थीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या राजुरेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. राजुरात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत भाविकांची रेलचेल सुरू होती.मंगळवारी येणाऱ्या अंगारिका चतुर्थीचे गणेश भक्तांमध्ये विशेष महत्व असते. नवसाला पावणारा गणराया म्हणून राजुरेश्वराची ख्याती असल्याने मराठवाडा, विदर्भासह कानाकोपºयातून भाविक दर्शनासाठी येथे येतात.सोमवारी रात्रीपासूनच भाविकांनी राजूरमध्ये गर्दी केली होती. सोमवारी रात्री १२ वाजता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, निर्मला दानवे, आ. नारायण कुचे यांच्या हस्ते राजुरेश्वराची महाआरती करून दर्शनासाठी मंदिराचे प्रवेशद्वार खुले करण्यात आले.मंगळवारी सकाळी भाविकांची गर्दी कमी झाली. मात्र, दुपारनंतर पुन्हा गर्दीचा ओघ सुरू झाला. दरम्यान, अनेक अन्नदात्यांकडून भाविकांसाठी ठिकठिकाणी मोफत चहा, फराळाची सोय करण्यात आली होती.दिवसभर पंचक्रोशीतून टाळ- मृदुंगाच्या गजरात गणरायाचा जयघोष करीत पायी दिंड्या राजुरात दाखल झाल्या. नुकताच झालेला गणेशोत्सव आणि पितृपक्ष पंधरवड्यामुळे गर्दीवर परिणाम झालेला दिसून आला.भाविकांनी जोरदार पावसासाठी राजुरेश्वराला साकडे घातले. भाविकांची गर्दी पाहता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. परिस्थितीवर तहसीलदार संतोष गोरड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये नियंत्रण ठेवून होते.सायंकाळपर्यंत किरकोळ प्रकार वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सपोनि. एम.एन. शेळके यांनी सांगितले.प्रशासनाच्या नियोजनाअभावी भाविकांची गैरसोयराजूर : अंगारकी चतुर्थी राजुरेश्वराच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांचे योग्य नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले नसल्याने मंगळवारी भाविकांची गैरसोय झाली. अंगारकी चतुर्थीला मराठवाड्यातून लाखो भाविकांचा जनसागर उसळतो. त्या दृष्टीने प्रत्येक अंगारकी चतुर्थीला गणपती संस्थान आणि पोलीस प्रशासनाकडून सोमवार पासूनच नियोजन केले जाते. परंतु, मंगळवारी नियोजन करताना भाविक व स्थानिक नागरिकांचा प्रशासनाकडून कोणताही विचार करण्यात आला नसल्याने त्यांची गौरसोय झाली.राजुरात दैनंदिन ३० ते ३५ खेड्यातील नागरिकांचा कायम वावर राहतो. यामुळे येथे नेहमी नागरिकांची गर्दी राहते. मंगळवारी प्रशासनाने राजूर पासून दोन किलोमीटर अंतरावर वाहनतळाची सोय केल्याने चिमुकल्यांसह आबाल- वृद्धांना पायी मंदिर गाठावे लागले. तसेच गावातील गल्लीबोळातील रस्ते खोदून चर पाडण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना घरी जाण्या येण्यासाठी कसरत करावी लागली. तसेच जागोजागी नाकाबंदी करून दुचाकी, कार चालकांना अडवण्यात आले.जालना- भोकरदन मार्गावर जड वाहतूक बंद करण्यात आली होती. पोलीस प्रशासनाने अनेक ठिकाणी रस्ते बंद केल्याने अनेक ठिकाणी पोलीस व नागरिकांमध्ये वाद- विवाद आढळून आले. विद्यार्थ्यांसह पालकांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणापासून वंचित राहावे लागले. गणपती संस्थान व पोलीस प्रशासनाने नियोजन करताना स्थानिक ग्रामस्थ, राजूरला नियमित येणारे नागरिक व जालना- भोकरदनला जाणा-या वाहनचालकांना पर्यायी सोय उपलब्ध करून न दिल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागला.हजारे यांना पहिल्या दर्शनाचा मानराजुरेश्वराच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिलेल्या फुलचंद भागवत हजारे व त्यांच्या पत्नी शारदा हजारे यांना पहिल्या दर्शनाचा मान मिळाला. त्यांचा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी निर्मला दानवे, आ. नारायण कुचे, उपविभागीय महसूल अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार संतोष गोरड, सरपंच भाऊसाहेब भुजंग, सुधाकर दानवे, शिवाजी पुंगळे, गणेश साबळे, प्रशांत दानवे, सपोनि. एम. एन. शेळके, सचिन वाघमारे, विनोद डवले, रामेश्वर सोनवणे, राहुल दरक, व्ही. आर. धर्माधिकारी, कृष्णा जाधव, आप्पासाहेब पुंगळे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :ganpatiगणपतीReligious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम