शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे शाखेला आयएसओ दर्जा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 23:32 IST

जालना : येथील गुन्हे शाखेने कार्यालयीन कामकाजात आणलेली सुसूत्रता, तपास कामाचा उंचावलेला दर्जा यामुळे या कार्यालयास आएसओ दर्जा प्राप्त ...

जालना : येथील गुन्हे शाखेने कार्यालयीन कामकाजात आणलेली सुसूत्रता, तपास कामाचा उंचावलेला दर्जा यामुळे या कार्यालयास आएसओ दर्जा प्राप्त होणार आहे. या संदर्भातील अंतिम परीक्षण सोमवारी झाले. येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासही हा दर्जा प्राप्त होणार आहे.कुठल्याही कार्यालयास आयएसओ दर्जा महत्त्वाचा मानला जातो. जिल्हा पोलीस दलाने आपल्या प्रशासकीय कामकाजांच्या अनेक बाबींमध्ये सुधारणा करत सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला आहे. आॅनलाइन कामास प्राधान्य दिले जात आहे. विशेष म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयाने अभिलेखांच्या नोंदी, प्रशासकीय कामकाज, गुन्ह्यांच्या तपासात झालेली वाढ यामुळे या शाखेची आयएसओ नामांकनासाठी नाशिक येथील एका संस्थेमार्फत परीक्षण सुरू आहे. सोमवारी संस्थेचे परीक्षक जयवंत पगारे, संदीप जाधव, समन्वयक राहुल वझे, परीक्षित शर्मा यांनी गुन्हे शाखा कार्यालयात दस्तावेज तपासणी केली. गुन्ह्यांच्या नोंदी, गुन्हे कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न, खातेनिहाय संचिका, कामाबाबत केलेली पूर्तता, संगणकीकृत कामकाज, धोरण, उद्दिष्टे, गुन्हे पडताळणी आदींची तपासणी करण्यात आली. येथील पोलीस कॉम्प्लेक्समधील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातही अशाच पद्धतीने तपासणी करण्यात आली. संस्थेच्या अधिका-यांनी आवश्यक नोंदी घेऊन लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. गुन्हे शाखा व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयास आयएसओ ९००१ व २०१५ हा दर्जा मिळणार असून, पालकमंत्र्यांच्या हस्ते २६ जानेवारीला याबाबतचे प्रमाणपत्र मिळणार असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी सांगितले.