शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय नोकरीसाठी बोगस प्रमाणपत्र तयार करणाऱ्या ६ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 18:38 IST

Crime in jalana : शासकीय नोकरीसाठी खोटे कागदपत्र सादर करून भटक्या विमुक्त प्रवर्गातील बंजारा जातीचे जातप्रमाणपत्र काढल्याची तक्रार दाखल झालेली

जालना : शासकीय नोकरीसाठी बंजारा जातीचे बनावट कागदपत्र सादर करून बोगस जात प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल हिंमत मोरे, किशोर वेंकट भिडे, अमित अशिष मेडकर, बाबुलाल मोफतलाल मोरे (सर्व रा. जालना) व महेश गुलाबराव राऊत (रा. कुंभेफळ, ता. जालना), अशोक सुभाष गायकवाड (रा. रेवगाव, ता. जालना) अशी संशयितांची नावे आहेत. ( Crime against 6 people for making bogus certificates for government jobs) 

विशाल मोरे, किशोर भिडे, अमित मेडकर, बाबुलाल मोरे यांनी शासकीय नोकरीसाठी खोटे कागदपत्र सादर करून भटक्या विमुक्त प्रवर्गातील बंजारा जातीचे जातप्रमाणपत्र काढल्याची तक्रार जालन्याचे उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांच्याकडे केली होती. या तक्रारीवरून सदरील प्रकरणाची चौकशी केली असता, ५ जुलै २०२१ रोजी महेश राऊत, अशोक गायकवाड यांच्याशी संगमनत करून खोट्या कागदपत्राच्या आधारे बंजारा जातीचे जातप्रमाणपत्र मिळविण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय जालना यांच्याकडे अर्ज सादर करून शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. 

हेही वाचा - व्हाईट कॉलर गुन्हेगारी ! दर्गाहची शंभर एकर जमीन बळकवणाऱ्या सहा उच्चशिक्षितांवर गुन्हा

त्यानंतर नायब तहसीलदार तुषार बाळासाहेब निकम यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री संशयित विशाल हिंमत मोरे, किशोर वेंकट भिडे, अमित आशिष मेडकर, बाबुलाल मोफतलाल मोरे (सर्व रा. जालना) व महेश गुलाबराव राऊत (रा. कुंभेफळ, ता. जालना), अशोक सुभाष गायकवाड (रा. रेवगाव, ता. जालना) यांच्याविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कदीम जालना पोलीस ठाण्याचे सपोनि. टाक यांनी दिली आहे. अद्याप आरोपी फरार असून, त्यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीJalanaजालना