शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भावाकीने केला घात; शेतीच्या वादातून कुऱ्हाड, तलवारीने वार करून शेतकऱ्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 17:51 IST

पाच जणांनी शेतीचा वाद आणि जुन्या भांडणाच्या कारणावरून हल्ला केला

ठळक मुद्देदीड लाख रूपयेही घेतले काढूनमयताच्या भावासह पाच जणांविरुद्ध गुन्हा

जालना : शेतीच्या वादातून एकावर कुऱ्हाड, तलवारीचे वार करून खून केल्याची घटना मांडवा (ता. बदनापूर) येथे शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी मयताच्या भावासह पाच जणांविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रतन गिरजाजी खंडाळे (६०, रा. मांडवा, ता. बदनापूर) असे मयताचे नाव आहे. मांडवा येथील रतन खंडाळे यांनी शेतातील बकऱ्या विकल्या होत्या. त्या बकऱ्यांचे दीड लाख रुपये त्यांच्याकडे आले होते. गावातील पाटलांकडून हात उसने घेतलेले पैसे परत देण्यासाठी रतन खंडाळे हे शुक्रवारी दुपारी दुचाकीवरून गावात जात होते. त्यावेळी पाच जणांनी शेतीचा वाद आणि जुन्या भांडणाच्या कारणावरून रतन खंडाळे यांची दुचाकी अडविली. तसेच त्यांच्यावर कुऱ्हाड, तलवारीने वार करून त्यांचा खून केला. 

शिवाय त्यांच्याकडील दीड लाख रुपये घेऊन पाच जणांनी पळ काढल्याचे मयताचा मुलगा गौतम रतन खंडाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. गौतम खंडाळे यांच्या फिर्यादीवरून त्र्यंबक गिरजाजी खंडाळे, रवी त्र्यंबक खंडाळे, गणेश त्र्यंबक खंडाळे, सतीश त्र्यंबक खंडाळे, संदीप उत्तम खंडाळे (सर्व रा. मांडवा, ता. जालना) यांच्याविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत. 

अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, पोलीस उपनिरीक्षक बोंडले, हवालदर वाघमारे, पोकॉ. अनिल चव्हाण, अनिल काळे, वाहनचालक परमेश्वर हिवाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच संशयित पाचही जणांना ताब्यात घेण्यात आले.

जिल्हा रूग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश घटनेनंतर नातेवाईकांनी जखमीला तातडीने जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मयत घोषित केले.  मयताच्या पार्थिवाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी मयताच्या नातेवाईकांनी एकाच आक्रोश केला होता. 

टॅग्स :MurderखूनJalanaजालनाagricultureशेती