शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालय होतेय हायटेक; कामकाजाची गती वाढविण्यासाठी डिजिटलसाधनांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 10:50 IST

पक्षकार,विधिज्ञ व प्रकरणांशी संबंधित सर्वांसाठी ई-मेल, मोबाईल अ‍ॅप आणि एसएमएसची सुविधा सुरू करण्यात आली असून, न्यायालयीन कामकाज आता हायटेक होत आहे.

ठळक मुद्देकाही महिन्यांपूर्वीच ई-कोर्ट सेवा नावाचे मोबाईल अ‍ॅप सुरु करण्यात आले आहे. ई-कोर्ट सुविधेंतर्गत वकील पक्षकारांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मेलवर प्रकरणाची अपडेट माहिती, प्रकरणाच्या सुनावणीची तारीख कळविली जाते.या अ‍ॅपमुळे राज्यातील कोणत्याही न्यायालयीन प्रकरणांची माहिती मिळविण्याची सुविधा पक्षकारांसह विधिज्ञांना मिळत आहे.

- प्रकाश मिरगे जाफराबाद (जालना ) : सर्वच क्षेत्रात आॅनलाईन कामकाजाला प्राधान्य दिले जात आहे. न्यायालयीन कामकाजाची गती वाढविण्यासाठी डिजिटलसाधनांचा वापर सुरू करण्यात आला आहे. आता पक्षकार,विधिज्ञ व प्रकरणांशी संबंधित सर्वांसाठी ई-मेल, मोबाईल अ‍ॅप आणि एसएमएसची सुविधा सुरू करण्यात आली असून, न्यायालयीन कामकाज आता हायटेक होत आहे.

न्यायालयात मोठ्या प्रमाणावर विविध प्रकरणातील खटले प्रलंबित आहेत. तारीख पे तारीख हे चित्र आता हळूहळू बदलत असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. फिरते लोक न्यायालय, लोकअदालत, विधि सेवा प्राधिकरणातर्फे राबविले जाणारे उपक्रम, विविध शिबिरे या माध्यमातून न्यायालयीन कामकाजाची गती वाढविण्यास प्राधान्य दिले जात आहे.

काही महिन्यांपूर्वीच ई-कोर्ट सेवा नावाचे मोबाईल अ‍ॅप सुरु करण्यात आले आहे. अ‍ॅप मोबाईलमध्ये राज्यातील कोणत्याही न्यायालयीन प्रकरणांची माहिती मिळविण्याची सुविधा पक्षकारांसह विधिज्ञांना मिळत आहे. ई-कोर्ट सुविधेंतर्गत वकील पक्षकारांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मेलवर प्रकरणाची अपडेट माहिती, प्रकरणाच्या सुनावणीची तारीख कळविली जाते. न्यायालयातील डिजिटल सुविधेचा फायदा पक्षकारांना होणार असल्याचे अ‍ॅड. विकास जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

न्यायालयांमध्ये प्रकरण दाखल झाल्यावर संबंधित पक्षकार, वकील यांच्याकडून एक अर्ज भरुन घेतला जात आहे. यात प्रकरणाशी संबंधित व्यक्तींचा मोबाईल क्रमांक , ई-मेल याची नोंद केली जात आहे. जुन्या प्रकरणांमध्येही अशी माहिती सादर करण्याची सुविधा आहे. हा अर्ज दिल्यानंतर पक्षकार वकिलांना प्रकरणाच्या प्रत्येक टप्प्यावरील स्थितीची माहिती एसएमएसद्वारे थेट मोबाईलवर कळविण्यात येत आहे.

टॅग्स :Courtन्यायालयJalanaजालना