शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

मतमोजणी केंद्राची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:27 IST

गुरूवारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी औरंगाबाद मार्गावरील दावलवाडी परिसातील एका कंपनीत त्या केंद्राची पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना लोकसभा मतदार संघात २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या नंतर तब्बल एक महिना इव्हीएम मशिनचा सांभाळ करावा लागणार आहे. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरूवारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी औरंगाबाद मार्गावरील दावलवाडी परिसातील एका कंपनीत ही मतमोजणी होणार असून, त्या केंद्राची पाहणी केली.जालना लोकसभा मतदार संघात जवळपास १८ लाख मतदार आहेत. त्यांना सुरळीत मतदान करता यावे म्हणून २००० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी सर्व त्या सुविधा तयार करण्याचे निर्देश दिले असून, त्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यातच आता जिल्हा प्रशासनात झालेल्या बदल्यामुळे निवडणूक उपजिल्हाधिकारी पदाचा पदभार हा जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर यांच्याकडे आला आहे.जिल्ह्यात बेलेट युनिट जवळपास तीन हजार ६७० सीयु मशीन, २ हजार ५२ आणि व्हीव्हीपॅट दोन हजार २५७ मशीन आहेत. त्या सर्व मशिनचीतांत्रिक तपासणी ही, आॅक्टोबरमध्ये पूर्ण झाल्याने त्या आता जवळपास तयार आहेत. या मशिनची तपासणी करण्यायसाठी बंगळुरू येथील २३ इंजिनिअर्स आले होते. या मशिन हैदाराबाद येथून जालन्यात दाखल झाल्या आहेत. एकूणच ही निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी १५ हजार कर्मचारी लागणार असून, वेगवेगळ्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना चार टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती दिली.आज करण्यात आलेल्या पाहणीत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या समवेत अभियंते तसेच निवडणुक उपजिल्हाधिकारी राजू नंदकर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थती होती. मतमोजणीची व्यवस्था अद्यायावत राहावी म्हणून एक स्वतंत्र नकाशा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे नेमक्या वस्तू कुठे ठेवण्यात आल्या आहेत. याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना