शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा धुमाकूळ; जालना जिल्ह्यातील एकाच गावातील 67 जण पॉझिटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 20:06 IST

पॉझिटिव्ह व्यक्तीच्या अंतिम संस्काराला जवळपास १५० ते २०० जणांनी हजरी लावली होती.

ठळक मुद्देखणेपुरी ठरतेय कोरोनाचे हॉटस्पॉटनागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जालना : जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी असतांनाच जालना तालुक्यातील खणेपुरी गावात मागील आठ दिवसांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. या गावातील ६७ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

गावात २५ नोव्हेंबर रोजी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या व्यक्तीच्या अंतिम संस्काराला जवळपास १५० ते २०० जणांनी हजरी लावली होती. त्यातच गावात सप्ताहाचे आयोजनही करण्यात आले होते. सप्ताहानिमित्त सर्वच नागरिक एकत्र आले होते. तेव्हापासून गावात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. २६ नोव्हेंबर रोजी गावातील नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी १,  सोमवारी ३५, मंगळवारी ५, बुधवारी १९ तर गुरूवारी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते.  सध्या जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी असली तरी एकट्या खणेपुरीत आठ दिवसात ६७ रूग्ण आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी कारला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने   तीन पथकांमार्फेत नागरिकांची तपासणी केली जात आहे. गावात औषध फवारणी करण्यात आली असून, नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत १५० जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील ६७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे वैद्यकीय अधिकारी एस. ए. रहिमाणी यांनी सांगितले. 

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची भेटजालना तालुका आरोग्य अधिकारी शीतल सोनी यांनी नुकतीच या गावास भेट दिली आहे. त्यांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामस्थांची दररोज तपासणी  करण्याची सूचना देण्यात आली.   गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, मास्क वापरावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू  नये, असे आवाहन खुणेपुरीचे ग्रामसेवक प्रकाश वाघ यांनी केले आहे.

आम्ही तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे गाव बंद करण्याची मागणी केली आहे.  तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे पोलीस कर्मचारी देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. गावात ६७ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ग्रामस्थांची तीन पथकांमार्फत दररोज तपासणी केली जात आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी.- शीतल सोनी, तालुका आरोग्य अधिकारी, जालना

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalanaजालना