शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी सणातही कोरोना योद्धे सतर्क; २४ तास केली रुग्णसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 15:05 IST

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना दिवाळीची सुटी पूर्वीप्रमाणे मिळाली नाही.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांनी सुटीचे नियोजन करून दिवाळी सणालाही कोरोनाच्या चाचण्या अविरत

जालना :  मार्च महिन्यापासून कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. असे असताना या आजाराशी आहे त्या औषधींचा वापर करून रुग्णांना दिलासा देत तर काही रुग्णांना अक्षरश: नवजीवन देत कोरोनायोद्धे अर्थात शासकीय तसेच खाजगी डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय हे ऐन दिवाळीतही रुग्णसेवा करण्यात मग्न असल्याचे दिसून आले. 

दिवाळी म्हटले की, प्रत्येकजण आपापल्या परिवारासोबत सण साजरा करताे; परंतु यंदा किमान वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना दिवाळीची सुटी पूर्वीप्रमाणे मिळाली नाही. यासाठी काही जणांनी दिवाळीआधी सुटीचे  नियोजन केले होते. तर काही जणांनी दिवाळीत रात्र आणि दिवस पाळी ठरवून कर्तव्य बजावल्याचे सांगण्यात आले. जालन्यातील कोविड  सेंटरचा विचार करता, तेथील आयसीयूमध्ये आजही ६२ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. यासह बाह्यरुग्ण विभागातील जनरल वॉर्डमध्ये शंभर ते  १५० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे एवढी मोठी रुग्णसंख्या असताना आम्हाला दिवाळीची सुटी मिळणे कठीण होते; परंतु आम्ही दिवाळीपूर्वी सर्व स्टाफची बैठक घेऊन  प्रत्येकाला दिवाळी साजरी करता आली पाहिजे आणि रुग्णांकडेही दुर्लक्ष होऊ नये, असे नियोजन केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली. 

कोरोनात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे संशयित रुग्णांचे स्वॅब घेऊन त्यांची ॲन्टिजन तसेच आरटीपीसीआर चाचणी करून घेणे हा होय. यामुळे येथील प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांनीदेखील सुटीचे नियोजन करून दिवाळी सणालाही कोरोनाच्या चाचण्या अविरत कशा राहतील, यावर भर दिला आहे. ज्याप्रमाणे शासकीय रुग्णालयात हे नियोजन केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर खाजगी कोरोना सेंटरचालकांनीदेखील केले असल्याचे सांगण्यात आले. आयएमएच्या सर्व डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरू ठेवल्याचे सांगण्यात आले. 

कोरोनाकाळात लॅब टेक्निशियनला मोठे महत्त्व असते. लॅबमध्ये स्वॅब घेऊन त्यांची तपासणी करून त्यांचा अहवाल हा प्रथम आयएमसीआरकडे पाठवावा लागतो. तेथून मंजुरी आल्यावरच तो रुग्णांना कळविण्यात येतो. ही सर्व प्रोसेस सुरू ठेवण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसले तसेच आमच्या वरिष्ठांनी आम्हाला ऐन दिवाळीच्या काळातही जालन्यात राहून २४ तास उपलब्ध राहण्याच्या सूचना आहेत. आम्ही त्याचे पालन करीत आहोत.  -विश्वनाथ नाईक, लॅब टेक्निशियन, जालना

टॅग्स :Jalanaजालनाcorona virusकोरोना वायरस बातम्या