जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या चार रुग्णांचा रविवारी मृत्यू झाला, तर तब्बल ९६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधितांमध्ये जालना शहरातील ४५ जणांचा समावेश आहे. कोरोनाचा चढता आलेख पाहता नागरिकांनी प्रशासकीय सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.
बाधितांमध्ये जालना शहरातीलच ४५ जणांचा समावेश आहे. त्याशिवाय घनसावंगी तालुक्यातील पाणीवाडा- १, तीर्थपुरी- १, अंबड शहर- २, पारडा येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बदनापूर तालुक्यातील दाभाडी- १, जाफराबाद शहर- १, सावरखेडा- २, खामखेडा -१, सावरगांव म्हस्के- १, टेंभुर्णी येथील दोघांना बाधा झाली आहे. भोकरदन शहर- ३, चांदई ठोंबरी - २, तर जयदेववाडी येथील ३१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिवाय बुलडाणा येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, अँटिजेन तपासणीद्वारे ३२ जणांना बाधा झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बाधितांची संख्या १४ हजार ५२८ वर गेली असून, त्यातील ३८४ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील यशस्वी उपचारानंतर १३ हजार ६६९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
गत दहा दिवसात आढळलेले रुग्ण
दिनांक बाधित मृत्यू
११ फेब्रुवारी ४४- ०१
१२ फेब्रुवारी ४५- ०१
१३ फेब्रुवारी ०७- ००
१४ फेब्रुवारी ४३- ००
१५ फेब्रुवारी २२-००
१६ फेब्रुवारी ५५-०१
१७ फेब्रुवारी ६६- ००
१८ फेब्रुवारी ४८- ०१
१९ फेब्रुवारी ६१- ०१
२० फेब्रुवारी ७०- ०३
२१ फेब्रुवारी ९६- ०४