जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सात जणांचा गुरुवारी मृत्यू झाला. तर गुरुवारीच ४५० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधितांमध्ये जालना शहरातीलच २९२ जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. बुधवारी आठ जणांचा कोरोनाने बळी घेतला होता. तर गुरुवारी सात जणांचा बळी घेतला आहे, तर प्राप्त अहवालात बाधितांची संख्याही ४५० वर गेली आहे. बाधितांमध्ये जालना शहरातील २९२ जणांचा समावेश आहे. तर बठण -२, बोरगाव -१, चंदनझिरा -५, दादावाडी -३, देवमूर्ती -१, इंदेवाडी -३, घोडेगाव -१, गोंदेगाव -१, जामवाडी -१, काजळा -२, मौजपुरी -१, नेर -२, पळसखेडा -१, पिंपळगाव -१, रेवगाव -१, सावरगाव हडप -३, सेवली -१, उखळी -१, विरेगाव -१, वाघ्रुळ -१, चितळी पुतळी येथील एकाला बाधा झाली आहे. मंठा शहर -५, ढोकसाळ -२, परतूर शहर -४, दैठणा -१, सावंगी -१, घनसावंगी तालुक्यातील टेंभी -४, बोरगाव खु. -१, राणी उंचेगाव -२, वडी रामसगाव -१, पिंपळगाव -१, मोहापुरी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अंबड शहर -१६, हस्तपोखरी -१, महाकाळा -२, मठ जळगाव -१, नारायणगाव -१, पारनेर -१, पाथरवाला -१, रुई -१, शहापूर -२, लालवाडी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बदनापूर शहर -१, खडगाव -३, नांदखेडा -१, केळीगव्हाण-२, राजेवाडी -१, सोमठाणा-१, डांगरगाव -१, जाफराबाद शहर -१, अकोला देव -२, देऊळगाव -१, गोकुळवाडी -१, कोळेगाव -१, म्हसरुळ -१, सावरगाव म्हस्के-२, टेंभुर्णी -२, वरुड -१, येवता -१, हरपळा येथील एकाला बाधा झाली आहे.
भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -१, आडगाव -२, बरंजळा -१, देहड -२, गोशेगाव –१, हसनाबाद -१, हिसोडा -१, जळगाव सपकाळ -१, जवखेडा -१, जयदेववाडी -२, माहोरा -१, पिंपळगाव कोळ -५, राजुर -६, सावखेडा -४, शेलूद -१, तडेगाव -१, वडी -१, वालसावंगी -३, इतर जिल्ह्यातील बुलडाणा -६, औरंगाबाद -६, बीड -१, नांदेड -२ अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे २८० तर अँटिजन तपासणीद्वारे ७० अशा एकूण ४५० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
अलगीकरणात १२३ जण
जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरण कक्षात १२३ जणांना ठेवण्यात आले आहे. यात राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक -२६, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक -१५, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक -४९, शासकीय मुलांचे वसतिगृह बदनापूर -२, के.जी.बी.व्ही. घनसावंगी -२५, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इमारत क्र. २ भोरकदन -४, आयटीआय कॉलेज जाफराबाद येथे दोन जणांना ठेवण्यात आले आहे.
४९२ जण कोरोनामुक्त
कोविड रुग्णालयातील उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या ४९२ जणांना गुरुवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील बाधितांची संख्या २३ हजार ७४६ वर गेली असून, त्यातील ४५८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्णालयातील यशस्वी उपचारानंतर २१ हजार ३३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.