शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

कोरोना संकटामुळे बाजारपेठेत शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 00:18 IST

कोरोना व्हायरसचे सावट आंतरराष्ट्रीय बाजाराबरोबरच आता जालना बाजारपेठेवरही पसरले आहे

संजय लव्हाडेलोकमत न्यूज नेटवर्कजालना : कोरोना व्हायरसचे सावट आंतरराष्ट्रीय बाजाराबरोबरच आता जालना बाजारपेठेवरही पसरले आहे. दुकानांमध्ये शुकशुकाट असून, जवळपास सर्वच वस्तूमालांमध्ये मंदी आली आहे. चीनमधून येणारा इलेक्ट्रॉनिक्स माल तसेच गाड्यांचे सुटे भाग मात्र महागले आहेत. जंतूनाशके तसेच सॅनिटायझर्स इ. औषधांना मोठी मागणी असून, त्यांची टंचाई निर्माण झाली आहे.ग्राहकांनी कोरोना व्हायरसचा मोठा धसका घेतला आहे. स्थानिक किराणा तसेच धान्य मालाला उठाव नसल्यामुळे त्यांच्या दरात मोठी घसरण पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे चीनमधून येणारे इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स, गाड्यांचे स्पेअर पार्ट्स महागले आहेत. पुढील काळात व्यापार सांभाळून करावा लागेल. कारण तेजी मंदी केव्हा येईल, हे सांगता येत नाही. असे आता सर्वच व्यापाऱ्यांना वाटू लागले आहे.गव्हाची आवक ७०० पोती इतकी असून, भाव १६०० ते २२०० रुपये, बाजरीची आवक २०० पोते इतकी असून, १०० रुपयांच्या मंदीनंतर भाव १२५० ते २०००, मक्याची आवक ३०० पोती इतकी असून भाव ११०० ते १४५० असे आहेत. तुरीची आवक ५०० पोते इतकी असून भाव ४६०० ते ५१००, सोयाबीनची आवक १०० पोते आणि भाव ३२५० ते ३३०० आहे. हरभरा - आवक १००० पोती आणि भाव ३५०० ते ३६०० आहे. मोसंबीची आवक ५० टन इतकी असून दर टनामागे ४ ते ५ हजारांनी गडगडल्यामुळे भाव ८००० ते १२५०० रुपये प्रति टन असे झाले. तेलाचे दरही ५०० रुपये प्रति क्विंटल घसरले. सोयाबीन तेल ८३००, सरकी तेल ७८५० असे दर आहेत. गावरान गुळाचे भाव ३२०० ते ३५०० रुपये तर मध्य प्रदेशातून येणा-या गुळाचे भाव ३००० ते ३१०० रुपये असे आहेत. साखरेतही ५० रुपयांची मंदी असून भाव ३३८० ते ३५०० रुपये असे आहेत. हरभरा डाळीचे भाव ४६०० ते ४७००, तूर डाळ ७००० ते ८०००, मूग डाळ ९५०० ते १०५००, मसूर डाळ ५८०० ते ६०००, उडद डाळ ७५०० ते ९५००, शेंगदाणा ८५०० ते १००००, साबुदाणा ५००० ते ५७०० प्रति क्विंटल असे दर आहेत.शनिवार व रविवारी सुटी असताना देखील मोतीबागेत शुकशुकाट आढळला. त्यामुळे भेळ- रगडा, पाणीपुरी, आईस्क्रीम इ. छोट्या व्यावसायिकांना मोठा फटका बसत असल्याचे दिसून आले.

टॅग्स :corona virusकोरोनाMarketबाजार