जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा गुरूवारी मृत्यू झाला, तर गुरूवारीच ४४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यशस्वी उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या ३० जणांनाही रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
बाधितांमध्ये जालना शहरातील २० जण आहेत. यामध्ये थिगळखेडा १, गाडेगव्हाण १, परतूर तालुक्यातील रोहिणा १, वाटूर फाटा १, घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव १, अंबड शहरातील दोघांचा समावेश आहे. बदनापूर तालुक्यातील सोमठाणा १, जाफराबाद तालुक्यातील पापळ १, खामखेडा १, वरूड १, देऊळगाव उगले गावातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भोकरदन शहरातील १, राजूर ४, बुलडाणा जिल्ह्यातील ६, तर औरंगाबादेतील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बाधितांची संख्या १४,०१५ वर गेली असून, त्यातील ३७३ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील उपचारानंतर आजवर १३,४३० जणांनी कोरोनावर मात केली आहे.