ढगाळ वातावरण
जालना : शहरासह परिसरात ढगाळ वातावरण कायम आहे. ढगाळ वातावरणामुळे रबीतील पिके धोक्यात आली आहेत. शिवाय सर्दी, खोकल्यासह इतर आजारांच्या रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
टरबूज उत्पादक चिंतेत
घनसावंगी : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी टरबुजाचे उत्पादन घेतले आहे. अस्मानी संकटांवर मात करून टरबूज शेती पिकविण्यात आली आहे. मात्र, सध्या बाजारपेठेत टरबुजाला कमी दर मिळत आहे. त्यामुळे केलेला खर्चही हाती पडेल की नाही, ही शेतकऱ्यांना चिंता आहे.
जि.प. शाळेत कार्यक्रम
जालना : माळतोंडी येथील जिल्हा परिषद शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संगीता राठोड, मुख्याध्यापक कारभारी ढाकणे, अलका वायाळ व इतरांची उपस्थिती होती.
वृक्षांची जोपासना
सेलगाव : बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत डेन्स फॉरेस्ट प्रकल्प या अंतर्गत वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. शिक्षक, विद्यार्थी या वृक्षांची जोपासना करीत आहेत.