शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी कामावर देखरेखीसाठी समिती नेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:40 IST

जालना शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून अंथरण्यात येत असलेल्या अंतर्गत जलवाहिनीचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. हायड्रोलिक चाचणी न घेता घाईगडबडीत हे काम पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे जलवाहिनीच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी समिती नेमण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी पालिकेच्या विशेष सभेत सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून अंथरण्यात येत असलेल्या अंतर्गत जलवाहिनीचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. हायड्रोलिक चाचणी न घेता घाईगडबडीत हे काम पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे जलवाहिनीच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी समिती नेमण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी पालिकेच्या विशेष सभेत सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.जालना शहरात भूमिगत गटार योजनेसाठी अमृत योजने अंतर्गत प्राप्त निविदेतील दरपत्रकार मान्यता देणे व प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे तांत्रिक मान्यतेसाठी पाठविणे या एकमेव विषयार चर्चा करण्यासाठी विशेष सभा घेण्यात आली. नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेकडर सभागृहात दुपारी बारा वाजता सभेला सुरुवात झाली. या वेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती.सुुरुवातीला नगराध्यक्षांनी कामकाजाच्या विषयावर बोलण्याची सूचना केली. एरवी सभागृहात मूलभूत समस्यांच्या मुद्द्यांवर आक्रमक होणारे सदस्य सभागृहात गप्प होते. त्यामुळे शिवसेनेचे गटनेते विष्णू पाचफुले यांनी ‘आज इतना सन्नाटा क्यूँ है भाई, असा उपरोधिक प्रश्न केला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रत्नाकर अडसिरे यांनी विषयाचे वाचन करून त्याबाबतची तांत्रिक माहिती सभागृहात दिली. याच वेळी पाचफुले यांनी अंतर्गत जलवाहिनीच्या कामाचा मुद्दा उपस्थित केला. अंतर्गत जलवाहिनीचे काम चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी समिती स्थापन करण्याचे नगराध्यक्षांनी मागील सभेत मान्य केले होते, मात्र कुठलीच समिती स्थापन झाली नाही. शहरात जलवाहिनी अंथरण्याचे काम कंत्राटदाराच्या पद्धतीने सुरू असून, अनेक भागातून नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. असे असतानाही ४० कोटींची देयके अदा केली. यात अनियिमिता आढळल्यास जबाबदार कोण, असा सवाल पाचफुले यांनी उपस्थित केला. तर जलवाहिनी अंथरण्याचे काम बोगस पद्धतीने सुरू असल्याचा थेट आरोप सदस्य रावसाहेब राऊत यांनी केला. जलवाहिनी अंथरलेल्या भागात हाडड्रोलिक चाचणी घेण्याबाबत आपण सभागृहात बोललो होता, समितीबाबत नाही, असे नगराध्यक्षांनी सांगितले. मात्र, समिती स्थापन करण्याच्या मुद्द्यावर अन्य सदस्यांनीही आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर लवकरच बैठक घेवनू याबाबत निर्णय घेतला जाईल, असे नगराध्यक्षांनी सांगितले. गटार योजनेचे कामही समितीच्या देखरेखीत व्हावे, अशी सूचना उपनगराध्यक्ष राऊत यांनी सभागृहात मांडली. शेवटी नियमानुसार विषय मंजूर मंजूर म्हणत सभा आटोपती घेण्यात आली.सभागृहात कायम हिंदीत बोलणारे सदस्य बाला परदेशी यांनी मराठी भाषा दिनानिमित्त मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी मराठीत बोलण्याचा सल्ला त्यांनी दिला. परदेशी नगराध्यक्षांना उद्देशून म्हणाले, की मी आपणाला माझ्या आईसारखे मानतो. माझी आई मला भूक लागली की लगेच जेवायला देते. मात्र, तुम्ही दीड वर्ष उलटूनही काहीच दिले नाही, असे का? या प्रश्नानंतर नगराध्यक्षा गोरंट्याल यांच्यासह अन्य सदस्यांनाही सभागृहात हसू आवरले नाही. सर्व सदस्यांकडे समान लक्ष देण्याची मागणी परदेशी यांनी नगराध्यक्षांकडे केली.