शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियातून भरले जाताहेत जिल्ह्याच्या राजकारणाचे रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:36 IST

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी कंबर कसली असून, सोशल मीडियातून राजकीय रंग भरण्यास सुरुवात झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी कंबर कसली असून, सोशल मीडियातून राजकीय रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. सोशल मीडियातील अ‍ॅप्सच्या माध्यमातून राजकीय नेत्यांची वातावरण निर्मिती केली जात आहे. यातून निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापविण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.लोकसभा आणि विधानसभेचा कालवधी संपण्यास एक कालावधी असला तरी राजकीय अस्थिरतेमुळे केव्हाही निवडणुक होऊ शकतात, हे चित्र आहे. या संभाव्य परिस्थितीमुळे सर्वच राजकीय प्रमुख पक्षांनी कंबर कसली असून, उमेदवारांची चाचपणी आणि पक्षाच्या शक्तीचा अंदाज घेतला जात आहे. पारंपरिक माध्यमांसह सोशल मीडिया २०१४ च्या निवडणुकांपासून अधिक प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले. किंबहुना सोशल मीडियामुळे अनेक उमेदवारांचा विजय झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले गेले. म्हणूनच राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. फेसबुकवर नेहमी चर्चेत राहण्यासह कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांशी जोडण्याचे कसब या नेत्यांनी प्राप्त केले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात झाली आहे. मतदार संघात संभाव्य उमेदवार आणि नेत्यांचे दौरे आणि मतदारांशी सुरु झालेला संवाद यामुळे निवडणुकीतील चुरस वाढण्याची चिन्हे आहेत. फेसबुकच्या माध्यमातून एका अ‍ॅप्सद्वारे जिल्ह्यातील नेत्यांना प्रोजेक्ट केले जात आहे.फेसबुक असणाऱ्यांना विविध प्रश्नांद्वारे नेत्यांच्या लोकप्रियतेची चाचपणी आणि मतदारांचा कल आतापासूनच घेतला जात आहे. जिल्ह्यातील कोणता राजकीय नेता तुम्हाला राजकारणात वाव देऊ शकतो, तुमचे विचार कोणत्या पक्षाशी मिळतेजुळते आहेत, अशा प्रश्नांद्वारे राजकीय वातावरण तापविले जात आहे.नेत्यांचे होतेय प्रोजेक्शन..विधानसभा मतदार संघनिहाय सोशल मीडियातील विविध अ‍ॅप्सद्वारे मतदारांना आकर्षित करुन चर्चा घडवून आणली जात आहे. यातूनच काही राजकीय पक्षांच्या नेत्यांचे प्रोजेक्शन केले जात असल्याचे दिसते. सोशल मीडियाचे वाढते महत्त्व पाहता राजकीय नेते या माध्यमाकडे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सक्रिय झाल्याचे दिसते. संभाव्य प्रतिस्पर्धी उमेदवारास शह देण्यासाठी या सोशल मीडियातून प्रयत्न केला जात आहे.