शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कलेक्टरसाहेब, निर्बंधाच्या वेळेतही शहरात दुकाने, हॉटेल्स आतून सुरू, बाहेरून बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:25 IST

जालना : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पाहता, शासनाने जालना शहरात चार वाजेपर्यंतच आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. असे ...

जालना : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पाहता, शासनाने जालना शहरात चार वाजेपर्यंतच आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. असे असले तरी निर्बंधांच्या वेळेतही सर्व काही उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे. दुकाने, हॉटेल्स बाहेरून बंद दिसतात; परंतु, आतून बिनधास्तपणे आणि पूर्ण क्षमतेने सुरू असल्याचे दिसून आले. असे असताना जिल्हा प्रशासनाकडून मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत असल्याचे चित्र सध्यातरी कुठेच दिसून येत नाही.

या दुकानांवर लक्ष कोणाचे?

शहरात सर्रासपणे दुकाने उघडी दिसतात. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबंधित पोलीस प्रशासन, नगरपालिका व नगरपंचायत आणि महसूल विभागाची आहे. परंतु, या कार्यालयांकडून दुकानांची तपासणीच केली जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिथिल वेळेतही सर्रासपणे बाजारपेठेत गर्दी असल्याचे दिसते.

किराणा हवा की जेवण?

अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना जालना शहरात दुपारी चार वाजताच बंद होणे अपेक्षित आहे. परंतु, रात्रभर ती चालूच असतात. हॉटेल्स पूर्ण क्षमतेने भरलेले असतात. तर किराणा दुकानेही सुरूच असतात. इतर आस्थापनादेखील अर्धे शटर उघडे ठेवून सुरू असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले.

भोकरदन नाका

जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हॉटेल्स सर्रासपणे सुरू दिसली. तर दुकानेही सुरू होती.

औरंगाबाद चौफुली

शहरातील औरंगाबाद चौफुली परिसरात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स आहेत. निर्बंधाच्या काळातही हे हॉटेल्स सुरू आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.