फोटो
केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गत दहा महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. पहिल्याच दिवशी शनिवारी आयोजित शिबिरात आठ शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या.
केदारखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत परिसरातील २७ गावांतील नागरिकांना आरोग्यसेवा पुरविली जाते. त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. गेल्या दहा महिन्यांपासून येथे दर आठवड्याला होणाऱ्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आल्या होत्या. लहान कुटुंबाचे महत्त्व पटल्याने अनेक जण शस्त्रक्रिया करण्यासाठी या रुग्णालयात येतात. कोरोना साथीतून शिथिलता मिळाल्यानंतर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर लटपटे यांनी वरिष्ठांकडे पाठपुरावा करून बंद झालेले शस्त्रक्रिया शिबिर सुरू केले आहे. या शिबिराचे तज्ज्ञ डॉ. पी.जे. कुरेशी यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी आठ शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या.
यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.जी. लटपटे, औषधनिर्माण अधिकारी डी.बी. गाढवे, आरोग्य पर्यवेक्षक बी.एस. बेडवाल, आरोग्य सहायिका एस.डी. पवार, आरोग्य सहायक एस.एम. वाघ, गटप्रवर्तक व्ही.बी. तांबे, एस.एस. नरवडे, आरोग्य सेविका के.एस. गावित, पी.सी. खडेकर, भाग्यश्री तळेकर, एस.जे. दांडगे, ए.आर. काळे, वाय.डी. गायकवाड, आर.एस. जाधव, के.बी. तोटे, ए.एस. शेजूळ, के.एम. बोचरे, एस.बी. सहाने, एम.के. हिरेकर, के.बी. दांडगे, ए.जी. काद्री, के.के. डोभाळ, के.डी. ठोंबरे, कनिष्ठ सहायक पी.के. सोनवणे, परिचर ए.जे. शेजूळ, सोनवणे, रुग्णवाहिका चालक आर.बी. राठोड यांच्यासह आशा स्वयंसेविकांनी परिश्रम घेतले.