शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परिसर स्वच्छतेत रमले न्यायाधीश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:05 IST

एरव्ही न्यायदानाच्या कामात व्यस्त असणारे न्यायाधीश चक्क हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छतेत रमले. मग वकील, न्यायालयीन कर्मचारी, नागरिकांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेत संपूर्ण न्यायालयाचा परिसर स्वच्छ केला.

जालना : येथील जिल्हा न्यायालयाच्या परिसरात रविवारी सकाळी वेगळे वातावरण पाहायला मिळाले. एरव्ही न्यायदानाच्या कामात व्यस्त असणारे न्यायाधीश चक्क हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छतेत रमले. मग वकील, न्यायालयीन कर्मचारी, नागरिकांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेत संपूर्ण न्यायालयाचा परिसर स्वच्छ केला.स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश नीरज धोटे यांच्या संकल्पनेतून या स्वच्छताविषयक उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. प्रधान न्यायाधीशांसह जिल्हा न्यायाधीश अनघा रोटे, न्या. एन. पी. कापुरे, न्या. जयश्री पुलारे, न्या. वेदपाठक, न्या. मिश्रा, न्या. बागडे, न्या. पवार, न्या. सोनी आदींनी सकाळी न्यायालयात आल्यानंतर हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छतेला सुरुवात केली. सकाळी नऊ ते एक या वेळेत राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानात सर्व न्यायालयीन परिसरातील प्लॅस्टिक वेचण्यात आले. गवत काढण्यापासून तर कचरा भरण्यापर्यंतच्या कामात प्रत्येकजण व्यस्त असल्याचे पाहावयास मिळाले. चार तासांच्या या स्वच्छता मोहिमेत सर्व न्यायालयीन इमारतींचा परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छता अभियानातून संकलित केलेला सर्व कचरा नगरपालिकेच्या कर्मचा-यांनी घंटागाड्यांमध्ये भरून डंपिंग ग्राऊंडवर नेऊन टाकला. जिल्हा सरकारी वकील विपुल देशपांडे, सहायक सरकारी अभियोक्ता दीपक कोल्हे, अ‍ॅड. वाल्मिक घुगे, कैलास रत्नपारखे, बी. एम. साळवे, अ‍ॅड. तारेख, वकील संघाचे अध्यक्ष एस.एम. चाटे आदींसह दीडशे न्यायालयीन कर्मचा-यांनी या स्वच्छता उपक्रमात सहभाग घेतला.