संत जगनाडे महाराज यांना अभिवादन
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे गावात ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर कानिफनाथ मंदिरात भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
अरगडे गव्हाण जिल्हा परिषद शाळेत कार्यक्रम
घनसावंगी : तालुक्यातील अरगडे गव्हाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कर्नल समीर गुजर, बलवंतराव गुजर, शंकर गुजर, शिवराम गुजर, रामेश्वर गोरे, राजेंद्र गुजर, संजय गुजर, कृष्णा शिंदे, मुख्याध्यापक पवळ, अफरीन सुलतान आदींची उपस्थिती होती.
मतदानासाठी कामगारांना सुटी द्या
जालना : ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आपापल्या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना भर पगारी सुटी द्यावी, अशा सूचना सरकारी कामगार अधिकारी यांनी दिल्या आहेत. कामगारांना मतदानासाठी सुटीचा मार्ग मोकळा झाला आहे.
अवैध प्रवासी वाहतूक रोखण्याची मागणी
जाफराबाद : शहरासह ग्रामीण भागात सध्या अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रस्ता अपघात वाढले आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.