मध्यंतरी कोरोना हद्दपार झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले होते. परंतु जानेवारी अखेरपासून या विषाणूने आपले रौद्र रूप दखवण्यास प्रारंभ केला आहे. गेल्या महिन्याभरात सहा हजार कोरोना रूग्ण आढळून आल्याने यंत्रणेची झोप उडाली आहे. प्रशासनाकडून सर्व ती खबरदारी घेतली जात आहे. अनेक कडक निर्बंध लावले आहेत. परंतु त्यातूनही पळवाटा शोधून या निर्बंधना जुमानत नसल्याचेही दिसून येत आहे. या परस्थितीने नागरिकांमध्ये आता कोणती काळची घ्यावी या बद्दल चर्चांना गती आली आहे.
चौकट
विषाणूनेही स्वत:त केले बदल
कोरोनाचा विषाणू अद्याप सर्वत्र कायम आहे. या विषाणूने अनेकांना या आधी घेरले आहे. त्याातून कसेबसे बरे झाल्या नंतर कोरोनशी लढण्यासाठीची प्रतिकार शक्ती त्या व्यक्तीच्या शरिरात निर्माण झाल्याचे बोलले जात होते. त्यामुळे एकदा कोरोनाची लागण होऊन गेल्यावर तो पुन्हा होत नाही. असा समज होता. परंतु तो समज गेल्या महिन्याभरातील रूग्ण संख्येचा अभ्यास आणि नरीक्षण केल्यास खोटा असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याचा विचार केल्यास ३०० पेक्षा अधिक जणांना कोरोनाने पुन्हा पॉझिटिव्ह केल्याचे दिसून येत आहे. या विषाणूने त्याची हल्ला करण्याची ताकद विकसित केली की काय असा संभ्रम आहे.
डॉ. आशिष राठोड, कोरोना उपचार तज्ज्ञ . जालना