शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोवरची लस दिल्यानंतर बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:57 IST

गोवरची लस दिल्यानंतर एका अकरा महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. जालना तालुक्यातील पोकळ वडगाव येथे शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.

जालना : गोवरची लस दिल्यानंतर एका अकरा महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. जालना तालुक्यातील पोकळ वडगाव येथे शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. घटनेनंतर आरोग्य विभागाच्या पथकाने गावात जाऊन चौकशी केली. मात्र, बालकाचा मृत्यू लस दिल्यामुळे झाला नसल्याचे सांगत जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.पोकळवडगाव येथे दुधना काळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका खेडकर व आरोग्य सेवक जावळे हे शुक्रवारी गावात नियमित लसीकरणासाठी गेले होते. त्यांनी गावातील सात बालकांना गोवरची लस टोचली. तसेच जीवनसत्त्व ‘अ’ चे औषध तोंडाद्वारे पिण्यास दिले. गावातील बद्रीनाथ बाळू उजेड या अकरा महिन्यांच्या बालकाला अशाच पद्धतीने लस व डोस देण्यात आला. लस दिल्यानंतर काही मिनिटांतच बद्रीनाथला उलट्या सुरू झाल्या. त्याची प्रकृती खालावून लागल्याने नातेवाईक त्याला जालना येथे उपचारासाठी घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोग्य विभागाच्या दोन्ही कर्मचाºयांना या प्रकाराबाबत माहिती देऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, अन्य बालकांना काहीच झाले नसल्याने बद्री उजेड या बालकाचा मृत्यू कशामुळे झाला हे आम्ही कसे सांगणार, असे बेजबाबदार उत्तर त्यांनी दिले. ग्रामस्थांनी दोन्ही कर्मचाºयांना गावात थांबवून वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क केला. वरिष्ठ अधिका-यांनी सुरुवातीला या घटनेकडे दुर्लक्ष केले. नातेवाईकांनी आरोग्य अधिकाºयांची पाच तास वाट पाहिली. मात्र, ते सायंकाळी पाचपर्यंत न आल्यामुळे अंत्यसंस्कार केले. अंंत्यसंस्कार झाल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते, तालुका आरोग्य अधिकारी एस. ए. सोनी हे पथकासह आले. चौकशीची औपचारिकता पूर्ण करून ते जालन्यात परतले.-------------या विषयी जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांना विचारले असता, कुठलीही लस दिल्यामुळे बालकाचा मृत्यू होत नाही. मृत झालेला बालक पूर्वीपासून आजारी होता. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचारही करण्यात आले होते. बालकाचा मृत्यू नेमका गोवर लस टोचल्यामुळे झाला की अन्य कारणामुळे हे सांगता येणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.