शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुलांना मिळणार जेईई, नीटचे मोफत धडे; जालना झेडपीच्या स्तुत्य उपक्रम

By विजय मुंडे  | Updated: June 2, 2023 18:32 IST

राज्यातील प्रथम उपक्रम; परीक्षेद्वारे होणार विद्यार्थ्यांची निवड

जालना : जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावीचे शिक्षण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या शेतकरी, कष्टकऱ्यांच्या ३० मुला- मुलींना मोफत जेईई, आयआयटी, नीटचे धडे देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जाणार असून, परीक्षेद्वारे या ३० मुला- मुलींची निवड केली जाणार आहे.

विद्यार्थ्यांची जेईई, आयआयटी, नीटच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी दोन वर्षात लाखो रुपयांचा खर्च पालकांना करावा लागतो. परंतु, ग्रामीण भागातील विशेषत: शेतकरी, कष्टकऱ्यांची मुलं-मुली हुशार असली तरी त्यांना हा खर्च परवडणारा नसतो. ही बाब ओळखून जिल्हा परिषदेच्या वतीने १५ मुले आणि १५ मुलींना दोन वर्ष कालावधीत अकरावी- बारावी शिक्षणासोबतच जेईई, आयआयटी, नीटचे मोफत धडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून खर्च करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी ११ जून रोजी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित १२० गुणांची परीक्षाजालना येथील जिल्हा परिषद प्रशालेत घेतली जाणार आहे.

मानधनावर होणार शिक्षकांची नियुक्तीविद्यार्थ्यांना फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे धडे देण्यासाठी मानधन तत्त्वावर चार तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे. हे चार तज्ज्ञ या ३० विद्यार्थ्यांची पुढील दोन वर्षात जेईई, आयआयटी, नीटची तयारी करून घेणार आहेत.

या शाळांतील मुलं होणार पात्रजिल्ह्यातील जिल्हा प्रशाला व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातून दहावीची परीक्षा दिलेले मुलं- मुली पात्र राहणार आहेत. या मुला-मुलींनी निर्धारित वेळेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून सादर करणे गरजेचे आहे.

मोफत निवास अन् भोजनाची व्यवस्थापरीक्षेद्वारे निवड केल्या जाणाऱ्या मुला-मुलींच्या निवास, भोजनाची मोफत व्यवस्था जिल्हा परिषद प्रशालेच्या परिसरातील इमारतीत केली जाणार आहे. शाळेतील प्रवेशासाठीही जिल्हा परिषदेकडून पाठपुरावा केला जाणार आहे.

मोफत प्रशिक्षण देऊ जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकऱ्यांची मुलं जिल्हा परिषद, कस्तुरबा गांधी विद्यालयात शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना दहावीनंतर जेईई, आयआयटी, नीटची तयारी करताना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील गरजू ३० विद्यार्थ्यांची परीक्षेद्वारे निवड करून जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.- वर्षा मीना, सीईओ, जि.प., जालना

टॅग्स :examपरीक्षाJalanaजालनाJalna z pजालना जिल्हा परिषद