शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींना न्याय दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:48 IST

छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन प्रत्येकाला न्याय देण्याचे काम केले. त्यामुळे कुठल्याही जाती-धर्माचा द्वेष न करता शिवरायांचे विचार आचारणात आणावे, असे आवाहन शिवाजी महाराजाचे तेरावे वंशज छत्रपती खा़ संभाजी राजे भोसले यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन: छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन प्रत्येकाला न्याय देण्याचे काम केले. त्यामुळे कुठल्याही जाती-धर्माचा द्वेष न करता शिवरायांचे विचार आचारणात आणावे, असे आवाहन शिवाजी महाराजाचे तेरावे वंशज छत्रपती खा़ संभाजी राजे भोसले यांनी केले.भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे शिवजयंतीनिमित्त रविवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण संभाजीराजे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप प्रदेशाध्यक्ष खा़रावसाहेब दानवे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. संतोष दानवे, निर्मला दानवे, रामेश्वरचे चेअरमन विजयसिंह परिहार, उपसभापती भास्कर दानवे, सुरेश बनकर, सभापती कौतिकराव जगताप, विलास आडगावकर, साहेबराव कानडजे, भाऊसाहेब जाधव यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना संभाजीराजे भोसले म्हणले की, जळगाव सपकाळ सारख्या छोट्याशा गावात महाराजांचा उभारलेला हा आश्वरूढ पुतळा सर्वांनी आर्दश घेण्यासारखा आहे. पुतळा उभारल्यामुळे येणा-या काळात त्यांच्या विचारांचे पालन करण्याची जबाबदारी गावातील प्रत्येकावर आहे. यावर्षी महाराजाची जयंती दिल्लीत राष्ट्रपतींच्या उपस्थितीती साजरी करण्यात आली. त्यामुळे महाराजांचे कार्य हे केवळ दिल्लीपर्यंतच नाही तर जगभरामध्ये पोहोचले. खा़ दानवे म्हणाले की, जळगाव सपकाळ या येथूनच कै. माजी आ़ विठ्ठलरावअण्णा यांच्याकडून राजकारण शिकलो. त्यामुळे या गावाशी माझी कायम नाळ जोडली गेली. आ. दानवे म्हणाले, की गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे काम पूर्ण होऊन काही महिने झाले. पुतळा अनावरणासाठी छत्रपती संभाजी राजे यांनाच आणावे असा आग्रह गावकºयांनी केला होता. त्यामुळे त्यांना निमंत्रण दिले व त्यांनी ते स्वीकारले. यावेळी आऱ ए़सपकाळ, डॉ. हेमंत सपकाळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला भाजपा तालुका अध्यक्ष राजेद्र देशमुख, गोविंंदराव पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश सपकाळ, जिल्हापरिषद सदस्य आशा पांडे, मुकेश पांडे, सुनीता सपकाळ, शाकिलराम म्हस्के, संतोष लोखंडे, डॉ. चंद्रकांत साबळे, विंठ्ठल चिंचपुरे आदींची उपस्थिती होती.