शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

चांदई एक्को ग्रामपंचायत दोन दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:16 IST

ग्रामसेविकेच्या मनमानी कारभाराला वैतागून चांदई एक्को येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला कुलूप ठोकले आहे. त्यामुळे अनेक कामे खोळंबली आहे. ग्रामसेविकेला कार्यमुक्त करेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

राजूर : ग्रामसेविकेच्या मनमानी कारभाराला वैतागून चांदई एक्को येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला कुलूप ठोकले आहे. त्यामुळे अनेक कामे खोळंबली आहे. ग्रामसेविकेला कार्यमुक्त करेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.चांदई एक्को येथील ग्रामसेविका आर. एस. काळपांडे या मनमानी कारभार करीत असून सरपंचासह सदस्य व ग्रामस्थांच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत. याबाबत वरिष्ठांकडेही निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे. मागील चार दिवसांपासून ग्रामसेविका सतत गैरहजर होत्या. त्यामुळे गावातील ग्रामस्थांचे कामे खोळंबली होती.ग्रामस्थांच्या तक्रारीवरून गटविकास अधिकारी यांनी काळपांडे यांचा तात्पुरता पदभार काढून त्यांची १३ डिसेंबरला गावात प्रतिनियुक्ती केली. तसेच त्यांचा पदभार आर. एम. वाहूळे यांना देण्याचे सांगितले. परंतु वरिष्ठांच्या आदेशानंतरही काळपांडे पदभार सोडण्यास तयार नाहीत. त्यांनी सोमवारी चांदई एक्को ग्रामपंचायत कार्यालयात येऊन काम सुरू केले. सरपंच सुनीता ढाकणे व त्यांंचे पती नानासाहेब ढाकणे कार्यालयात आल्यानंतर ग्रामसेविकेने त्यांना ग्रामस्थांसमक्ष तुम्हाला कोणताही अधिकार नाही, तुम्ही माझी कोणतीही चौकशी करू शकत नाही. अशी अपमानास्पद वागणूक दिली. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामसेविकेला बाहेर काढून कार्यालयाला कुलूप ठोकले. गेल्या दोन दिवसांपासून ग्रामपंचायत बंद असल्याने ग्रामस्थांच्या कामाचा खोळंबा होत आहे.