शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जालना शहरात ठिकठिकाणी दत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:52 IST

येथील नरिमाननगरातील श्रीक्षेत्र दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा, विकास व बालसंस्कार केंद्रात रविवारी भक्तिमय वातावरणात दत्त जयंती साजरी करण्यात आली. दिगंबरा....दिगंबरा.... श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला.

ठळक मुद्देनरिमाननगर : दिगंबरा.. दिगंबराच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय, विविध कार्यक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील नरिमाननगरातील श्रीक्षेत्र दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा, विकास व बालसंस्कार केंद्रात रविवारी भक्तिमय वातावरणात दत्त जयंती साजरी करण्यात आली. दिगंबरा....दिगंबरा.... श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला.दत्त जयंतीनिमित्त रविवारी पहाटेपासून शहरातील केंद्रांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ठिकठिकाणच्या केंद्रात पहाटे गुरूचरित्र पारायणाचा समारोप करण्यात आला. नित्य स्वाहाकार, दुर्गा सप्तशतीच्या चौथ्या आध्यायाचे वाचन करून बलीपूर्ण आहूती अर्पण करण्यात आली. नरीमान नगर केंद्रात नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते आरती करण्यात आल्यानंतर दुर्गा सप्तशतीचे महिला सेवेकºयांनी सामूहिक पाठ घेतले. स्वामी चरित्र सारामृताचेही वाचन करण्यात आले. दुपारी पुष्पा तनपुरे यांनी गुरूचरित्राच्या चौथ्या अध्यायातील दत्त जन्माचे निरूपण केले. या वेळी काकासाहेब भडांगे यांनी दत्त अवताराचे महत्व विषद केले. महिला सेवेकºयांनी विविध भजने, भारूडे सादर केली. यामुळे वातावरण भक्तीमय झाले होते. रूख्मिणी पाटील यांनी वासुदेवाचा हुबेहुब देखावा सादर केला. केंद्राच्या वतीने भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी कुलभुषण जैस्वाल, बबनराव गाडेकर, नानाभाऊ उगले, राम सावंत, संजय चौधरी, चंद्रकांत दरबस्तरवार, भाऊसाहेब घुगे, जगन घोडे, कल्याण सोळंके, लक्ष्मण तारो, डॉ. मानधना, आशा उगले यांच्यासह महिला पुरूष व सेवेकºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दत्त जयंतीनिमित्त येथे सुरु असलेल्या अखंड नामजप यज्ञ सप्ताहाची सोमवारी सांगता होणार आहे.