जालना : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दीपावलीप्रमाणे घरोघरी उत्साहात साजरी करावी, असे आवाहन शिवछत्रपती संस्कृती क्रीडा मंडळ संचलित सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
उत्सव समितीच्या वतीने गुरुवारी गोशाळेत चारावाटप तसेच गरजवंत महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उत्सव समितीचे मार्गदर्शक अंकुशराव राऊत, दिगंबर पेरे, अध्यक्ष रवींद्र राऊत, कार्याध्यक्ष सुभाष देविदान, सचिव ॲड. रवींद्र डुरे, कोषाध्यक्ष सतीश जाधव, उपाध्यक्ष विजय पंडित, विमलताई आगलावे, क्रांतीताई खंबाईतकर, विभावरी ताकट, सुवर्णा राऊत, प्रकाश जगताप, विलास तिकांडे, प्रवीण बावणे, सुशील शिंदे, मुन्ना गजभिये, गणेश सुपारकर, तय्यब देशमुख, बोडखे आदींची उपस्थिती होती. कोरोनामुळे सर्वजनिक मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी घराेघरी भगवा ध्वज लावावा, सायंकाळी आतषबाजी करावी, शिवचरित्राचे वाचन करावे, असे आवाहन अंकुशराव राऊत यांनी केले आहे.
कॅप्शन : जालना शहरातील गरजवंत महिलांना साड्यांचे वाटप करताना अंकुशराव राऊत, रवींद्र राऊत, सुभाष देवीदान, सतीश जाधव, विमलताई आगलावे, विभावरी ताकट, सुवर्णा राऊत, प्रकाश जगताप, सुशील शिंदे व इतर.