शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्या कॅमेऱ्यात कैद; पण पिंज-यात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अंबड तालुक्यातील वडीगोद्री व परिसरात बिबट्याच्या दहशतीने परिसरातील दहशत कायम आहे. या बिबट्याने वडीगोद्री जवळील गुंडेवाडी परिसरात बुधवारी ग्रामस्थांना पुन्हा दर्शन दिले. मात्र या बिबट्याने कोणावर हल्ला केला नाही. मात्र, या भागात बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले असून, बिबट्याच्या हालचाली चार दिवसांपूर्वीच वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमे-यात कैद ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अंबड तालुक्यातील वडीगोद्री व परिसरात बिबट्याच्या दहशतीने परिसरातील दहशत कायम आहे. या बिबट्याने वडीगोद्री जवळील गुंडेवाडी परिसरात बुधवारी ग्रामस्थांना पुन्हा दर्शन दिले. मात्र या बिबट्याने कोणावर हल्ला केला नाही. मात्र, या भागात बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले असून, बिबट्याच्या हालचाली चार दिवसांपूर्वीच वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमे-यात कैद झाल्या आहेत. हा बिबट्या तीन वर्षाचा असावा असे अनुमान काढले आहे. या बिबट्याच्या हल्ल्यात एकजण ठार झाला आहे.गेल्या दोन महिन्यापासून वडीगोद्री तसेच परिसरातील काही गावात बिबट्या आल्याची माहिती परिसरातील ग्रामस्थांनी वन विभागाला दिली होती. दरम्यानच्या काळात या बिबट्याने परिसरातील अनेक गायी, म्हशी, वासरावर हल्ला करून आपली भूक भागविली होती. मात्र, आता या भागातील ग्रामस्थांना या बिबट्याची जणूकाही सवयच झाली अशा स्थितीत आता भीती दूर झाल्याचे ग्रामस्थांनी वन विभागातील अधिकाºयांना सांगितले. असे असले तरी ग्रामस्थांनी या भ्रमात राहू नये, तो हिंस्त्र प्राणी आहे. तो केव्हाही हल्ला करू शकतो. अशी सूचना दिली आहे.वनविभागाने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या परिसरात यापूर्वीच तीन पिंजरे लावले आहेत. तसेच तीन पथकांची स्थापना केली असून, वनविभागाचे चार कर्मचारी हे परिसरात रात्रीची गस्त तसेच वेळप्रसंगी मुक्काम करत असल्याची माहिती जालना येथील वनिविभागाचे वरिष्ठ अधिकारी जी.एम. शिंदे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. बिबट्याचे दर्शन हे वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमे-यात टीपल्या आहेत. तसेच तो शार्प शूटर आणि वैद्यकीय पथकाच्या नजरेसही आला होता. त्याला बेशुद्ध करण्यासाठीची तयारी पूर्ण झाली असतानाच तो त्या भागातील उसाच्या शेतात पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.बुधवारी रात्री देखील पथकातील सदस्य जागता पहारा देणार आहेत. कुठल्याही स्थितीत त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.पाणी सोडल्याने अडचण : जी. एम. शिंदेपैठण येथील नाथसागरातून वडीगोद्री जवळील उजव्या कालव्याला गेल्या पंधरा दिवसांपासून पाणी सोडले आहे. हे पाणी परिसरातील शेतक-यांनी उसाला दिले आहे. त्यामुळे पूर्वी पाणी आणि भक्ष्याच्या शोधात बिबट्या उसाच्या शेतातून बाहेर पडत होता.मात्र, आता त्याला उसाच्या शेतात पाणी मिळत असल्याने तो क्वचितच बाहेर येत आहे. भूक लागल्यावरच तो बाहेर पडणार असल्याने त्याच्या हालचालींवर आता बारकाईने लक्ष दिले जात असल्याचे सहायक वनसंरक्षक अधिकारी जी.एम. शिंदे यांनी सांगितले.धावडा येथे गायीचा फडशाधावडा : भोकरदन तालुक्यातील मेहगाव परिसरात बिबट्याच्या दर्शनाने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. बुधवारी सकाळी या भागातील शेतकरी शेरखान सरदार खान पठाण यांच्या शेतात बिबट्याने गोठ्यातील बांधलेल्या गायीचा फडशा पाडला. सकाळी पठाण यांचा मुलगा इब्राहीम खान हा शेतात आला असता त्याला गोठ्यात गाय न दिसल्याने शोध घेतला असता मक्याच्या शेतात बिबट्या दिसल्याने तो घाबरून गेला. त्याने आरडा-ओरड केल्याने परिसरातील शेतकरी धावून आले. तोपर्यंत बिबट्याने तेथून पळ काढला होता. याच भागातील जाहेद गुलाब यांनाही बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगितले. ही माहिती वन विभागाला कळविली आहे. या प्रकारामुळे भीती निर्माण झाली आहे.

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग