शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२७२ कोटींचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:49 IST

जालना नगरपालिकेच्या वित्तीय वर्ष २०१८-१९ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास सोमवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित सभेत मंजुरी देण्यात आली. अर्थसंकल्पात शहरातल्या मूलभूत सोयी-सुविधांसह प्रशासकीय आणि अस्थापना खर्चासाठी एकूण २७२ कोटी ३९ लक्ष, ४७ हजार ५०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना नगरपालिकेच्या वित्तीय वर्ष २०१८-१९ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास सोमवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित सभेत मंजुरी देण्यात आली. अर्थसंकल्पात शहरातल्या मूलभूत सोयी-सुविधांसह प्रशासकीय आणि अस्थापना खर्चासाठी एकूण २७२ कोटी ३९ लक्ष, ४७ हजार ५०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, अतिरिक्त मुख्याधिकारी केशव कानपुडे यांच्या उपस्थिती दुपारी बारा वाजता अर्थसंकल्पीय सभेस सुरुवात झाली. सभागृहात विरोधी भाजप, सेनेच्या सदस्यांची संख्या कमीच होती. सभेच्या सुरुवातीला सदस्य महावीर ढक्का यांनी मालमत्तांच्या सर्वेक्षणासाठी नियुक्त एजन्सीने किती मालमत्तांचा सर्वेक्षण केले, त्यास आगामी वर्षात कर लावला का, या मुद्यावर खुलासा करण्याची मागणी मुख्याधिका-यांकडे केली. नवीन व जुन्या ७० हजार मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, ही माहिती जिल्हा नगररचनाकारांकडे पाठविण्यात आली आहे. मात्र, कर्मचा-यांची संख्या कमी असल्यामुळे नव्याने कर आकारणी झालेली नाही. लवकरच हे काम पूर्ण होईल, असे मुख्याधिकारी खांडेकर यांनी सांगितले. जिंदल मार्केटमधील ४०० गाळ्यांना कर का आकारला नाही, हा मुद्याही सभागृहात उपस्थित करण्यात आला. नागेवाडीपर्यंत नगरपालिकेची हद्द असताना, जालना-औरंगाबाद मार्गावर टोलनाक्यालगत उभारण्यात आलेल्या इमारतीला टॅक्स का लावला जात नाही, या मुद्याकडे शशिकांत घुगे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. याबाबत माहिती घेऊन कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन खांडेकर यांनी दिले. शहरातील सरस्वती मंदिराकडे बांधण्यात आलेल्या एकाही सदनिकेला पाच वर्षांपासून टॅक्स लावलेला नाही, तसेच या मालमत्तांचे सर्वेक्षणही झाले नाही याबाबत संबंधित अधिका-यांनी खुलासा करावा, अशी मागणी राहुल रत्नपारखे यांनी केली. अन्य सदस्यांनी हा मुद्दा गंभीर असल्याचे सांगितले. कर आकारणी विभागाच्या अधिका-यांनी दिलेल्या उत्तरावर सदस्यांचे समाधान झाले नाही. जयंत भोसले यांनी अतिरिक्त शिक्षकांना जि. प. कडे वर्ग करण्याची सूचना केली.नगरपालिकेची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असलेले महावीर मंगल कार्यालय केवळ ५०-६० हजार रुपये वार्षिक करारावर देण्यात आले. या ठिकाणी वरचा मजला तोडून इंग्रजी शाळा सुरू करण्यात येत आहे, असे करता येते का हा सवाल सदस्य रावसाहेब राऊत यांनी उपस्थित केला. कुणाशी हातमिळवणी करून, हा प्रकार सुरू आहे याचा खुलासा करण्याची मागणी राऊत यांनी केली. तर ज्ञानेश्वर ढोबळे यांनी आमदार, खासदार फंडातून बांधण्यात आलेली सभागृहे, समाज मंदिर याची नोंद घेऊन उत्पन्न वाढीसाठी त्याचा वापर करण्याचा सूचना सभागृहात मांडली.शहरातील बेकायदेशीर होर्डिंगमुळे नगरपालिकेचे उत्पन्न बुडत असून, शहराचे विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळे अनधिकृत होर्डिंग काढून टाकाव्यात व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी बाला परदेशी यांनी केली. उत्पन्न वाढीच्या अन्य मुद्यांवरही सभागृहात चर्चा झाल्यानंतर अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. हा अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिका-यांकडे पाठवला जाणार आहे.