शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
2
BANW vs INDW : भारतीय महिलांनी रचला इतिहास; बांगलादेशला त्यांच्यात घरात ५-० ने नमवले
3
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
4
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
5
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
6
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
7
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
8
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
9
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
10
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
11
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
12
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?
13
चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!
14
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
15
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
16
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका
17
राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम वेगाने सुरु; ‘असा’ असेल राम दरबार, कधी होणार पूर्ण?
18
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
19
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
20
‘पैसे मिळाले नाहीत का तुला? मिळाले नसतील तर...’, भरसभेत अजित पवार यांनी विचारलं आणि...

राष्ट्रीय महामार्गावर ‘पूल कम बंधारा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 11:35 PM

जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या नवीन राष्ट्रीय महामार्गांवर 'पूल कम बंधारा' उभारणीच्या कामांना केंद्रीय रस्ते वाहतूक तथा जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे.

जालना: केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभागांतर्गत जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या नवीन राष्ट्रीय महामार्गांवर 'पूल कम बंधारा' उभारणीच्या कामांना केंद्रीय रस्ते वाहतूक तथा जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली.लोणीकर यांनी रविवारी नागपूर येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्ते कामांबाबत चर्चा केली. जिल्ह्यात नवीन राष्ट्रीय महामार्गांवर 'पूल कम बंधारा' (पूल हाच बंधारा) ही योजना राबविण्याची मागणी गडकरी यांच्याकडे केली. या बंधा-यांमुळे पाणी अडवून त्याचा उपयोग शेतीसाठी होणार आहे. मंठा तालुक्यातील वाटूर फाटा ते देवगाव फाटा या २० किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाकडून राज्याचे रस्ते विकास मंडळाकडे वर्ग करावे, या मागणीला गडकरी यांनी मान्यता दिली आहे. केंद्रीय जलसंपदा मंत्री गडकरी यांनी आवश्यक तिथे तेथे पुलांचे कामातील खर्चाच्या अंदाजपत्रकातील दहा टक्के रक्कम बंधा-यांच्या कामांसाठी खर्च करण्यास तत्त्वत: मान्यता दिल्याचे लोणीकर यांनी सांगितले. निम्न दुधना दुधना प्रकल्पाचे काम पंतप्रधान सिंचन योजनेअंतर्गत सुरू आहे. सन २०१६ मध्ये हा प्रकल्प शंभर टक्के भरल्याने या प्रकल्पातील पाणी परिसरातील १९० हेक्टर क्षेत्रावरील शेतक-यांच्या शेतात गेले. त्यामुळे संबंधित शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. भविष्यात असे नुकसान होऊ नये यासाठी या परिसरातील अतिरिक्त भूसंपादनासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी केंद्रीय जलसंपदा मंत्र्याकडे करण्यात आली. महामार्गांवरील पुलांखाली बंधारे उभारणीमुळे या भागातील भूजल पातळी वाढेल तसेच पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे लोणीकर यांनी सांगितले.--------------या मार्गावर होणार पूल कम बंधारेजिल्ह्यातून जाणा-या जालना-वाटूर-मंठा-जिंतूर-बोरझरी-परभणी, शहागड-वडीगोद्री-अंबड-जालना, शेगाव-लोणार-मंठा-वाटूर-परतूर-आष्टी-लोणी-माजलगाव-धारूर-केज-कळंब-बार्शी-कुडूर्वाडी-पंढरपूर या रस्त्यावर अशा पद्धतीचे बंधारे होणार आहेत.