रेखा जंजाळ यांचा सत्कार
आव्हाना : भोकरदन तालुक्यातील मौजे आव्हाना येथून जवळच असलेल्या भायडी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या रेखा जंजाळ यांचा नुकताच भाजपचे सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष गणेश ठाले यांच्या निवासस्थानी संगीता ठाले यांनी सत्कार केला.
फोटो
हिंदू संत सभेच्या जिल्हाध्यक्षपदी मंहंत शास्त्री यांची नियुक्ती
जालना : हिंदू संत सभेच्या जालना जिल्हाध्यक्षपदी महंत सुदामराज शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंबड रोडवरील महानुभव आश्रम येथे ईश्वर बिल्होरे, अशोक भगुरे, शेतकरी नेते बबन गवारे, लहुजी शक्ती सेनेचे सचिन क्षिरसागर यांच्या उपस्थितीत हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सुर्यवंशी यांनी नियुक्तीपत्र दिले. या निवडीचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
फोटो
चिमुकल्यांकडून श्रीराम मंदिरासाठी निधी
जालना : येथील तीन चिमुकल्यांनी वर्षभरापासून जमा केलेले खाऊचे पैसे अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीसाठी समर्पित करुन खारीचा वाटा उचलला आहे. हिंदू महासभेचे संघटन मंत्री धनसिंह सूर्यवंशी यांचे सुपूत्र राणा क्रांतीसिंह, राणा रणविरसिंह आणि प्रज्ञादेवी या तीन बालकांनी वर्षभरापासून जमा केलेले गल्ल्यातील खाऊचे पैसे श्रीराम मंदिराच्या भव्य निर्मितीसाठी समर्पित केले. जालना शहरातील मामा चौकातील श्रीराम मंदिर निधी संकलन समितीच्या कार्यालयातील स्वयंसेवक नितीन बागडी व किशोर दुर्गम यांच्याकडे सदरील निधी सुपूर्द करण्यात आला. यावेळी धनसिंह सूर्यवंशी, प्रितीदेवी सुर्यवंशी, हिंदू महासभेचे युवा नेतृत्व ईश्वर बिल्होरे, अशोक भगुरे, कृष्णासिंह बुंदेले, शिवमसिंह बंगरे, वेदश्री बिल्होरे यांची उपस्थिती होती. सदरील बालकांची धर्माप्रती निष्ठा व राष्ट्रप्रेम तरुणाईला प्रेरणादायी असल्याने सर्वस्तरातून या बालकांचे कौतूक करण्यात येत आहे.