शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जागेअभावी तूर खरेदीला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:34 IST

शासकीय गोदामात तूर ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने सोमवारी हमीभाव केंद्रावर तूर खरेदी ठप्प होती. आता तूर ठेवण्यासाठी वखार महामंडळाच्या अधिका-यांनी तूर ठेवण्यासाठी गोदामाचा शोध सुरू केला आहे. यामुळे तूर खरेदीबाबत नियोजनाचा अभाव दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासकीय गोदामात तूर ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने सोमवारी हमीभाव केंद्रावर तूर खरेदी ठप्प होती. आता तूर ठेवण्यासाठी वखार महामंडळाच्या अधिका-यांनी तूर ठेवण्यासाठी गोदामाचा शोध सुरू केला आहे. यामुळे तूर खरेदीबाबत नियोजनाचा अभाव दिसून येत आहे.गेल्या वर्षी नाफेडने जिल्ह्यात पाच टप्प्यात १ लाख ७३ हजार क्विंटल तूर हमीभावाने खरेदी केली होती. यामुळे शासकीय गोदाम तुरीने भरले आहेत. हीच परिस्थिती राज्यभर असल्याने तुरीची विल्हेवाट कशी लावावी असा प्रश्न जिल्हा मार्र्केटिंग विभागाला पडला आहे. जिल्ह्यातील जालना, भोकरदन, आष्टी, वडीगोद्री इ. ठिकाणी असलेल्या शासकीय वेअर हाऊसमध्ये अद्यापही १ लाख ४० हजार क्विंटल तूर पडून आहे. त्यातच जिल्ह्यातील आठ हमीभाव केंद्रावर आत्तापर्यंत खरेदी करण्यात आलेली १० हजार क्विंटल तुरीची त्यात भर पडली आहे. खरेदी केलेली तूर सिटी वेटर हाऊसमध्ये ठेवण्यात येत होती. मात्र त्यात जागाच शिल्लक नाही. यामुळे काही दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात तूर ठेवण्यात येत आहे. मात्र, या गोदामात आधीच शेतमाला तारण योजनेतील सोयाबीन, तूर, हरभरा इ. शेतमाल ठेवलेला आहे. गोदामाची क्षमता संपत आली आहे. जागेअभावी खरेदी केलेली तूर चोरी होण्याची भीती असल्याने तूर खरेदी थांबविण्याच्या सूचना जिल्हा मार्केटिंग विभागाकडून देण्यात आल्याची माहिती आहे. साडेपाच हजारपेक्षा जास्त शेतक-यांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे.मात्र, आतापर्यंत दीड हजार शेतक-यांची हमीभावाने तूर खरेदी करण्यात आली आहे. उर्वरित शेतक-यांना खरेदीबाबत प्रतीक्षा लागून आहे.