शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांचे लसीकरण, जेष्ठांना बूस्टर डोसच्या परवानगीसाठी केंद्र सरकारकडे विनंती : राजेश टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 11:56 IST

Rajesh Tope On Corona Vaccine: डिसेंबर अखेर राज्यातील सर्वांना पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट

जालना : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील १० ते २० वयोगटांतील एक हजारपेक्षा अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली असल्याचे पुढे आले आहे. ही बाब गंभीर असून, त्यांच्यापासून संसर्ग टाळण्यासाठी घरातील ज्येष्ठांना बूस्टर डोस आणि ११ ते १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरणास परवानगी देण्याची विनंती ( Rajesh Tope On Corona Vaccine For childrens )  आपण केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे केली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope ) यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

राज्यातील शाळा, महाविद्यालये उघडली आहेत. त्यामुळे शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढली आहे. त्यातूनच त्यांना कोरोनाची बाधा झाली असावी असा अंदाज आहे. परंतु, असे असले तरी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे टोपे म्हणाले. या मुलांमध्ये खूप गंभीर अशी लक्षणे नसून, केवळ हीच लहान मुले घरातील ज्येष्ठांच्या संपर्कात येतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ११ ते १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण महत्त्वाचे आहे. यासह ज्येष्ठांना बूस्टर डोस देण्याबाबतही विचार होणे गरजेचे आहे. टास्क फोर्ससोबत या विषयावर चर्चा करून याची अंमलबजावणी करण्यासाठी एक कृती कार्यक्रम हाती घेऊ, असेही टोपे म्हणाले.

राज्यात कोरोना आटोक्यातदररोज सरासरी ५०० ते ८०० रुग्ण सापडत असल्याचे ते म्हणाले. डिसेंबर अखेर राज्यातील सर्वांना पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट असून, त्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. त्यात केंद्राच्या हर घर दस्तक आणि मिशन कवच कुंडल यातून हे डोस दिले जात असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या