शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अशी ही बनवाबनवी... ग्रामसभा न घेताच बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:30 IST

घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथील ग्रामंपचायतीने सोमवारी ग्रामसभा घेतली नाही, मात्र जिल्हा परिषदेच्या डीपीसीच्या पोर्टलवर सभा झाल्याचे सांगीतल्याने ग्रा.पं. ची बनवेगिरी उघड झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथील ग्रामंपचायतीने सोमवारी ग्रामसभा घेतली नाही, मात्र जिल्हा परिषदेच्या डीपीसीच्या पोर्टलवर सभा झाल्याचे सांगीतल्याने ग्रा.पं. ची बनवेगिरी उघड झाली आहे.या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा गेल्या काही महिन्यांमध्ये न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नराजीचा सूर आहे. ग्रामसभा मागील पंधरा आॅगस्ट आणि दोन आॅक्टोबरलाही झालेली नाही. त्यातच ग्रामविकास अधिकारी वारंवार गैरहजर राहत असल्याने गावातील समस्या कोणाकडे मांडाव्यात असे निवेदन ग्राम विकास युवा मंच ने दिले आहेग्रामसभेत प्रत्येक मतदार व गावातील नागरिकांना बोलण्याचा व ग्रामसभेत रस्ता, पाणी, गटार, वीज, शिक्षण, आरोग्य, शौचालये, रेशन, रोजगार, घरकुले असे कोणतेही नागरी, सार्वजनिक हिताचे प्रश्न उपस्थित करण्याचा व त्यावर चर्चा ही ग्रामसभेत होते. ती झालीच नाही.आॅनलाइन झाली ग्रामसभाग्रामसभा होत नसल्याने ग्रामस्थांनी निवेदने देउन पंचायत समितीला मागणी केली होती. मात्र अद्यापही ग्रामसभा झाली नसल्याने ग्रामपंचायतला येणारा १४ व्या वित्त आयोगाचा निधी कसा खर्च होतोय याचा काहीही ताळमेळ नसल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्यात लिंकवर ग्रामसभेचे फोटो अपलोड करणे चालू आहे. मात्र प्रत्यक्षात ग्रामसभा झालीच नाही.याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी सांगितले की या बाबत माहिती घेऊन गटविकास अधिकाऱ्यांसह जे दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतfraudधोकेबाजी