जालना : शहरातील ज्ञानज्योत विद्यालय, जेमस्टोन वर्ल्ड स्कूल व रोट्रक्ट क्लब ऑफ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानज्योत विद्यालयात शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात शेकडो नागरिकांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानज्योत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब बायस होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, आ. कैलाश गोरंट्याल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, निलेश राऊत, डॉ. आदिनाथ पाटिल, राहुल हिवराळे, अशोक पांगरकर, गोपाल जिंदल यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात आ. गोरंट्याल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर रक्तदात्यांच्या हिमोग्लोबीन, रक्तदाब आणि इतर तपासण्या करून प्रत्यक्ष रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावर डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. भारतसिंग चव्हाण, प्रा. नारायण बोराडे, संजय काळबांडे, बाबुराव सतकर, फकिरा वाघ, सतीश होंडे, आलोक सरवडीकर, प्रतीक्षा नंदा, डॉ. योगेश राजपुत, परसराम अवघड यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक संजय सरकटे यांनी केले. सूत्रसंचालन किशोर खरात यांनी केले. तर निलेश हिवाळे यांनी आभार मानले.