शिबिराचे उद्घाटन डॉ. जी. एम. बांगड यांच्याहस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गणेश नळगे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. आर. नवल, डॉ. रवींद्र बरकुले, डॉ. संदीप चव्हाण, प्रा. संभाजी तिडके, राजेश भुजबळ, बी. एन. हिवाळे, अशोक तनपुरे, डॉ. भानुदास कदम, डॉ. कल्याण बोनगे, कृृष्णा आरगडे हे होते.
शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने शहरात विविध सांस्कृतिक उपक्रमांबरोबरच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करण्यात आले. यावेळी प्रा. पांडुरंग नवल, विनायक भिसे, प्रभाकर नळगे, विष्णू शिंदे, नवनाथ तनपुरे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.