घनसावंगी तालुक्यातील भुतेगाव हे गाव लहान असून, या गावची लोकसंख्या १ हजार ५०० आहे. यात ९०० मतदार असून, गावात सर्व समाजाचे लोक राहतात. गावातील जवळपास शंभर टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. भुतेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची तयारी महिनाभरापासून सुरू झाली. गावातील सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र बसून गावाचा एकोपा टिकविण्यासाठी व गावाच्या विकासासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरविले. यानंतर गावातील सर्व नागरिकांनी बैठक घेऊन त्यात गावातील निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. ज्यांना निवडणूक लढवायची आहे, त्यांची नावे घेऊन त्यातील कामे करणाऱ्या नागरिकांना सर्वानुमते उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करतानाही केवळ सात जणांनीच उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, कोणीही आक्षेप घेतला नाही.
उमेदवारी अर्ज भरलेल्यांमध्ये शोभा चिमणकर, मीना मेंढरे, प्रयागाबाई नरवडे, बद्रीनारायण भुतेकर, रुक्मिणी भुतेकर, कमल भुतेकर, बबन शेंडगे यांचा समावेश आहे.
कोट
आम्ही पक्ष संघटना बाजूला ठेवत गावाच्या विकासासाठी व गावातील सर्वांमध्ये एकोपा राहावा यासाठी गावपातळीवर निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. सात जागांसाठी सातच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
भरत भुतेकर, ग्रामस्थ