शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

टायगर श्रॉफची नायिका बनवतो; साडेचार लाख दे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 01:13 IST

टायगर श्रॉफसोबत चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी गार्डियन व अन्य खर्चासाठी पैसे लागतील, असे सांगून एका कथित दिग्दर्शकाने जालन्यातील एका तरुणीला साडेचार लाखांंना गंडा घातला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तुम्हाला प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफसोबत चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी गार्डियन व अन्य खर्चासाठी पैसे लागतील, असे सांगून एका कथित दिग्दर्शकाने जालन्यातील एका तरुणीला साडेचार लाखांंना गंडा घातला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.चित्रपटात काम करण्याची तरुण-तरुणींमध्ये प्रचंड क्रेझ असते. त्यासाठी अनेक खटाटोपही केले जातात. याचा फायदा घेत अनेकजण चित्रपटात तरुणांची फसवणूकही करतात. असाच प्रकार जालन्यातील प्राजक्ता सुनील ढाकणे (२०, रा. कालीकुर्ती) या तरुणासोबत घडला. एका वर्तमान पत्रात बॉलीवूडमध्ये काम मिळवून देण्याबाबत आलेल्या जाहिरातीच्या आधारे प्राजक्ता यांनी दिल्लीच्या इम्पक्ट फिल्म अ‍ॅण्ड प्रा. लि. या कंपनीच्या क्रमांकावर संपर्क केला. त्यानंतर नाशिकहून हर्षद आनंद सपकाळ व दिल्लीहून सुनील बोरा यांनी प्राजक्ता यांच्याशी संपर्क साधला. दोघांनी काम मिळवून देता म्हणून वारंवार संपर्क करून विश्वास संपादन केला. त्यानंतर प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफच्या नायिकेची भूमिका मिळाल्याचे सांगितले. यासाठी गार्डियन फीस व अन्य खर्चासाठी सव्वा तीन लाख रुपये लागतील असे सांगितले. प्राजक्ता यांनी दोघांवर विश्वास ठेवून तीन लाख २४ हजार रुपये आॅनलाइन ट्रान्सफर केले. त्यानंतर दोघांनी वारंवार संपर्क करून वेगवेगळ्या फिसच्या नावाखाली वेगवेगळ्या तारखांना आणखी एक लाख २७ हजार रुपये उकळले.पैसे उकळले : शूटिंगचा पत्ता नाहीप्रत्यक्ष कामाबाबत विचारल्यानंतर लवकरच शूटिंग सुरू होणार असल्याचे सांगितले. वारंवार संपर्क करूनही कुठलेच काम मिळत नसल्याने सदर दोघांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर प्राजक्ता ढाकणे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.या प्रकरणातील आरोपींच्या शोधात पोलिसांचे पथक मुंबईला गेले आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी दिली.चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने संशयितांनी या पूर्वी अशाच पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीtiger Shroffटायगर श्रॉफ