शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

अंजली दमानिया यांना जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:47 IST

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शनिवारी परतूर न्यायालयात हजेरी लावली. न्यायालयाने त्यांना वैयक्तिक बंधपत्रावर जामीन मंजूर केला

परतूर : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शनिवारी परतूर न्यायालयात हजेरी लावली. न्यायालयाने त्यांना वैयक्तिक बंधपत्रावर जामीन मंजूर केला. बागेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजी जाधव यांनी दमानिया यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दखल केला होता.दमानिया यांनी बागेश्वरी कारखान्यासचे चेअरमन शिवाजीराव जाधव व त्यांच्या काही संस्थांवर आरोप केले होते. यामध्ये श्रध्दा एनर्जीच्या सीएमडींनी दहा हजार एकर जमीन खरेदीसाठी पैसा कोठून आणला. तसेच काही सिंचन प्रकल्पात घोटाळा झाल्याचे आरोप केले होते. श्रद्धा कंपनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची असून, ती शिवाजी जाधव चालवत आहेत. सिंचन प्रकल्पाच्याठेकेदारीतून चेअरमन जाधव यांनी जळगावचा मुक्ताई कारखाना घेतला, अशा प्रकारचे हे आरोप आहेत. विविध वृत्तपत्र व वाहिन्यांना याबाबत माहिती देऊन चेअरमन शिवाजी जाधव व त्यांच्या संस्थांची बदनामी केल्या प्रकरणी परतूर येथे १९ आॅक्टोबर २०१६ रोजी अंजली दमानिया यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. या प्रकरणात शनिवारी न्यायालयाच्या नोटिशीनुसार दमानिया सकाळी अकरा वाजता परतूर न्यायालयात हजर झाल्या. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.फौजदारी गुन्हा नोंदवणार आहे- दमानियान्यायालयात उपस्थित पत्रकारांशी दमानिया यांनी चर्चा केली. श्रध्दा एनर्जी ग्रुपने संकेतस्थळावरील दहा हजार एकर जमिनीचा उल्लेख काढून टाकला आहे. त्याचे आपल्याकडे पुरावे आहेत. याप्रकरणी आपण फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत. मी अभ्यासपूर्ण बोलत असून, केलेल्या आरोपावर ठाम आहे. हा खटला परतूरऐवजी जळगाव किंवा इतरत्र दाखल करायला हवा होता. केवळ मला त्रास देण्यासाठी हा खटला परतूरला दाखल करण्यात आला. आपण हे प्रकरण शेवटपर्यंत लढत राहणार असल्याचे दमानिया यांनी सांगितले.आरोपात तथ्य नाही- जाधवबागेश्वरीचे चेअरमन शिवाजीराव जाधव म्हणाले की, अंजली दमानिया यांनी केलेल्या खोट्या आरोपांमुळे आमच्या संस्थांची बदनामी झाली. बँकांनी आम्हाला कर्ज नाकारले. दमानिया यांनी केलेल्या आरोपात काही तथ्य नाही. संकेत स्थळावरील माहिती आमची आहे. काढली काय आणि ठेवली काय? शेतक-यांच्या दहा हजार एकरवर आम्ही ठिबक केले. जमीन आमची नाही. शेवटपर्यंत खटला हा लढू.