शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘यमन, मालकंस’च्या सादरीकरणाने श्रोते मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:41 IST

गायनाचार्य स्व.गोविंदराव जळगावकर स्मृती संगीत समारोह तथा दत्तजयंती संगीत उत्सवास शनिवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : गायनाचार्य स्व.गोविंदराव जळगावकर स्मृती संगीत समारोह तथा दत्तजयंती संगीत उत्सवास शनिवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. पं. गिरीश गोसावी, पं. संजय गरुड, वृषाली देशमुख, मिलिंद गोसावी, निरंजन भालेराव यांच्या सुरेल आवाजात या उत्सवास सुरुवात झाली. अभिजात संगीताचा वारसा जपणाऱ्या या संगीतोत्सवात राग यमन, रागेश्री, मालकंस, किरवानी आणि कलाश्रीच्या सादरीकरणाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.अंबड येथे समर्थ सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित ९५ व्या दत्त जयंती संगीतोत्सवाच्या पहिल्या संगीत सभेची सुरुवात औरंगाबादच्या निरंजन भालेराव यांच्या बासरीवादनाने झाली. त्यांनी एकताल, मत्तताल आणि त्रितालात राग यमनचा सुंदर विस्तार केला. बासरीवर असलेली त्यांची हुकुमत आणि लयकारीने त्यांनी सुंदर वातावरण निर्मिती केली. छोट्या बासरीवर पहाडी धून सादर करून त्यांनी श्रोत्यांच्या प्रचंड टाळ्या मिळवल्या. त्यांना अनिरुध्द देशपांडे यांनी तबल्यावर पूरक साथ करीत बासरीवादन अधिक खुलवले.लातूरच्या वृषाली देशमुख यांनी राग रागेश्री सादर केला. ‘येरी पिया नही आये’ तर द्रुत तीनतालात त्यांनी 'बन बन बोलत कोयलिया' ही चीज सादर करून आपल्या मधुर गायनाचा परिचय करून दिला. 'ताण दे रे ना दिम तुम' हा तराणा सादर करीत रसिकांना डोलायला लावले. संत मीराबाईच्या 'मत वारो बालनिया को, हरी का संदेश मुझे' या रचनेने त्यांनी वातावरण भक्तीमय केले. धनराशी जाता मुढापाशी, सुखवी तुला सुखवी मला' हे नाट्यगीत गाऊन त्यांनी या जुन्या नाट्यपदाला सुंदर उजाळा दिला. त्यांना हार्मोनियमवर शशिकांत देशमुख आणि तबल्यावर मुकुंद मिरगे यांनी साथ दिली.पैठण येथील मिलिंद गोसावी यांनी राग मालकंस सादर केला.'सखी मन लागे ना' ही चीज एकतालात तर 'माई री मै कैसे पाऊ दरस' ही चीज त्रितालात सादर करताना त्यांनी लयकारी आणि स्वररचनेचे उत्तम दर्शन घडवले. औरंगाबादचे ज्येष्ठ गायक तथा नाथवंशज पं. गिरीश गोसावी यांनी आपल्या गायनाने एका संपन्न आणि व्यासंगी गायनाचा परिचय करून दिला. पहिल्या संगीतसभेची सांगता पुण्याच्या पं. संजय गरुड यांच्या गायनाने झाली, राग कलावती आणि रागेश्रीचे मिश्रण असणारा राग कलाश्री त्यांनी सादर केला.'जो भजे हरी को सदा, वो ही परम पद पायेगा' हे भैरवी रागातील अवीट पद विस्ताराने आणि आर्ततेने सादर करीत त्यांनी तब्बल सहा तास अखंडपणे चालू असलेल्या या मैफिलीची सांगता केली. त्यांना तबल्यावर अनिरुद्ध देशपांडे, धनंजय जळगावकर व हार्मोनियमवर शांतीभूषण चारठाणकर यांनी साथ करीत हे गायन अधिक संपन्न केले. या संगीतसभेचे सूत्रसंचालन अनंतउमरीकर यांनी केले.

टॅग्स :musicसंगीतcultureसांस्कृतिक