शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:40 IST

न्यायालयातील कामकाजाला होणा-या विलंबास कंटाळून धाकलगाव (ता.अंबड) येथील सुनील सुभाष लगडे (२८,रा. पीरगैबवाडी ) या युवकाने बुधवारी सकाळी न्यायालयाच्या आवारात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : न्यायालयातील कामकाजाला होणा-या विलंबास कंटाळून धाकलगाव (ता.अंबड) येथील सुनील सुभाष लगडे (२८,रा. पीरगैबवाडी ) या युवकाने बुधवारी सकाळी न्यायालयाच्या आवारात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.सुनीलचे वडील सुभाष लगडे पीरगैबवाडी (ता.घनसावंगी) येथील रहिवासी आहे. त्यांनी बाळाभाऊ लागडे यांच्याकडून दोन हेक्टर जमीन विकत घेतली होती. त्यांनतर बाळाभाऊ यांचे वारस सुगंधा लगडे यांनी न्यायालयात दावा दाखल केला असता, सुगंधाबाई आणि सुभाष लगडे यांची न्यायालयात तडजोड झाली. त्यानंतर सुभाष लगडे यांनी सुगंधाबाई यांना पाच एकर जमिनीची विक्री करून, त्या पैशातील गावात म्हशी घेऊन दूध व्यवसाय सुरू केला. चारचाकी वाहन घेतले. व्यवसाय फसल्यामुळे सुभाष लगडे हे कुटुंबीयांसह पुणे येथे कामास गेले. त्यानंतर सुभाष व सुगंधाबाईसह उर्वरित वारसांना बाळाभाऊ यांनी उर्वरित सर्व जमीन विक्री केली. सुभाष व बाळाभाऊ दोघेही आजारपणामुळे मरण पावल्यामुळे सुनील व शीलाबाई लागडे हे पीरगैबवाडी येथून धाकलगाव येथे राहायला गेले. सुनील व शीलाबाई लगडेने विक्री केलेल्या जमिनीवर वारसाचा दावा अंबड कोर्टात २०१० ला दाखल केला.१५ वर्षापूर्वी वडिलांनी विक्री केलेल्या जमिनीवर न्यायालयात वारसा हक्क चालत नसल्यामुळे व कामास विलंब होत असल्याने सुनीलने ंकंटाळून कोर्टाच्या आवारात विषारी द्रव घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.वारसा हक्क चालत नसल्यामुळे सुनीलने कोर्टाच्या आवारात कीटकनाशक घेतले आहे. कोर्ट निकालाची पुढील तारीख २३ मार्च असून न्यायालयाच्या प्रतीक्षेत आहे. सुनीलचे वकील अ‍ॅड.अरुण काफरे व प्रतिवादीचे वकील अ‍ॅड. राजेश्वर देशमुख आहेत.