शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

अस्मितादर्शने साहित्याला नवीन चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:39 IST

अस्मितादर्शच्या माध्यमातून दिवंगत गंगाधर पानतावणे यांनी वंचित समाजाला एकत्रित करून एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले. आज त्यांचा हा वारसा निवेदीता पानतावणे यांनी पुढे नेत असल्याचा मला अभिमान असल्याचे माजी मंत्री तथा काँग्रेसच्या मागासवर्ग समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

ठळक मुद्देनितीन राऊत, श्रीपाल सबनीस, डी. बी. जगतपुरीया : साहित्यात स्वअनुभवातून वास्तव मांडण्याची परिवर्तनवाद्यांची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अस्मितादर्शच्या माध्यमातून दिवंगत गंगाधर पानतावणे यांनी वंचित समाजाला एकत्रित करून एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले. आज त्यांचा हा वारसा निवेदीता पानतावणे यांनी पुढे नेत असल्याचा मला अभिमान असल्याचे माजी मंत्री तथा काँग्रेसच्या मागासवर्ग समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.राऊत म्हणाले, गंगाधर पानतावणे यांनी नवीन लेखकांची पिढी घडवितांना त्यातून दर्जेदार सािहत्य निर्मिती कशी करावी या बद्दल टीप्स दिल्या. आज महाराष्ट्रात अनेकजण त्यांच्या प्रेरणेतून लिहिते झाले. माझा आणि गंगाधर पानतावणेंचा अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. लहानपणापासून मी सरांचा चाहता होतो. सरांच्या प्रेरणेतूनच नागपूर येथे अस्मितादर्शचे साहित्य संमेलन घेतल्याची आठवण डॉ. नितीन राऊत यांनी सांगितल्या. त्यांनी आजच्या एकूणच स्थितीवर परखड टीकेची झोड उठविली. आज देशात अघोषीत आणीबाणी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रत्येकजण यामुळे अप्रत्यक्षपणे भयभित झाला आहे. एकूणच आजचे जालन्यातील हे साहित्य संमेलन म्हणजे एक दिशादर्शक घटना असल्याचे सांगून, कवी, लेखकांच्या लेखणीतील शब्दांमध्ये मोठ शक्ती असल्याचे ते म्हणाले. लेखकांनी समाजातील अन्याय, अत्याचार तसेच शोषित समाजातील अनुभव भयमुक्त मांडण्याचे धाडस करावे असे आवाहनी नीतीन राऊत यांनी केले. आजही मातंग समाजातील नवदांपत्याला लातूर जिल्ह्यात मंदिर प्रवेशापासून रोखून त्यांना मारहाण केल्या जात असल्याच्या घटना घडत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त करत निषेध व्यक्त केला.देशात दोन आरएसएस : सबनीसदेशात दोन आरएसएस आहेत. असे वक्तव्य करून अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी मोठी खळबळ उडवून दिली. त्यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ज्या प्रमरणे उजव्या विचारणीत जातीयवाद आहे. तसाच तो डाव्या विचारणतही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आपल्याला आता डॉ. बाबासहेबांचा मध्यममार्ग स्विकारण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सबनीस यांनी एकूणच त्यांच्या खास शैलित देश आणि राज्यातील सद्यस्थितीचा आढावा सादर केला. जातीय वादाची कोंडी फोडण्याचे आवाहनही त्यांनी केले. निळा झेंड्याचा मुद्दा काढून त्यांनी निळ्या झेंड्याने इतरांच्या रंगात समावून जाण्याची गरज नसून, निळ्या झेंड्याखाली सर्वानी एकत्रित येण्याची गरज व्यक्त केली. दिवंगत गंगधर पानतावणे आणि आपले संबंध हे १९८८ ला आले होते, असे सांगून त्यांनी गंगाधर पानतावणे हे माझे मानस बाप होते असे सांगितले. १९८८ पासून आपण या अस्मितादर्शशी जोडले गेलो असल्याचे सबनीस म्हणाले. अस्मितादर्शची वाटचाल ही विज्ञानवादी असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. अस्मितादर्श ही चळवळ केवळ विचारांची बांधिलकी जपणारी असल्याचा उल्लेखही सबनीस यांनी केला.दैववादावर अवलंबून राहू नका : जगत्पुरीयाप्राचीन काळापासून उच्चवर्णीयांनी आपल्या बहुजनांना देव, व्रतवैकल्य आणि चालीरिती चुकीच्या पध्दतीने बिंबवल्या आहेत. पाप-पुण्यचा उहापोह करून अशिक्षित समाजाला दैववादाकडे वळविले असे प्रतिपादन या संमेलनाचे अध्यक्ष डी.बी. जगत्पुरीया यांनी केले. ते म्हणाले, आज स्थिती बदलली आहे. शिक्षणामुळे काय खरे आणि काय खोटे हे समाजातील शेवटच्या घटकालाही कळू लागले आहे. यात साहित्यिकांचा मोठा वाटा आहे. कविता, कथा आणि त्यातील वास्तव अनुभव यामुळे दलित साहित्याला एक उंची मिळली आहे. ही मिळालेली उंची वाढविण्याचे काम अस्मितादर्शच्या माध्यमातून दिवंगत गंगाधर पानतावणे यांनी हक्काचे व्यासपीठी निर्माण केल्याने ती जनसामन्यांपर्यंत पोहचली आहे. कवीता तसेच अन्य साहित्यातून समाजाचा वास्तव चेहरा मांडण्याचा जो प्रयत्न सध्या दलित तसेच परिवर्तन साहित्यिकांकडून सुरू आहे.

टॅग्स :JalanaजालनाAsmitadarsh Sahitya Sammelanअस्मितादर्श साहित्य संमेलन